मुक्तपीठ टीम
येत्या काही कालावधीतच भारतीय नौदलाचा जर्मन नौदलाच्या ताफ्यातील ‘ फ्रिगेट बायर्न’ नौकेसोबत सागरी सराव (पॅसेज सराव) होणार आहे. भारत आणि जर्मनी यांच्यातील नौदल संबंधांना बळकटी देणारी जर्मन ‘ फ्रिगेट बायर्न एफ २१७’ गुरुवारी मुंबईत दाखल झाली. या युद्धनौकेचे भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर आणि महाराष्ट्राचे राजशिष्टाचार , पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले.
‘ही फ्रिगेट ‘कोरोना’ काळात येथे डॉकिंग करणे शक्य केले. दोन मित्रांमध्ये ही भेट आहे. ६० % आंतरराष्ट्रीय व्यापार पॅसिफिक प्रदेशातून जातो, असे भारतातील जर्मन राजदूत यावेळी म्हणाले. २४ जानेवारी पर्यंतच्या अवधीसाठी जर्मन नौदलातील नौका ‘बायर्न’ मुंबईत पोहचली. मुंबई येथे ‘पोर्ट कॉल’ करणार असलेल्या ‘बायर्न’च्या भेटीची पूर्वसूचना होती. ही भेट पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांच्या नौदलांमधील व्यावसायिक संबंध अधिक वाढवण्यासाठी भारतीय नौका ‘विशाखापटण्म ’ सोबत पॅसेज सरावाचे नियोजन करण्यात आले आहे.
‘बायर्न’ही फ्रिगेट नौैका (एफ २१७) जर्मन नौदलातील ब्रँडडेनबर्ग वर्गातील आहे. जर्मनीने हँबर्ग क्लास विनाशिकांच्या जागी ब्रँडडेनबर्ग वर्गातील या फ्रिगेट नौैका आपल्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. ‘बायर्न’ही फ्रिगेट नौैका १५ जून १९९६ मध्ये जर्मनी देशाने नौदल ताफ्यात दाखल केली आहे. ती फ्रिगेट नौका ४५५.५ फुट लांबीची आहे. तिचा वेग २९ सागरी मैल (५४ किमी/ वेग ताशी ३३ किलोमीटर ) इतका आहे. ही नौका अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, विमानावर डागता येणारी क्षेपणास्त्रांसह या नौकेवर ‘दोन सी लिंक्स’ हेलिकॉप्टर्स असून, पाणबुडीविरोधी पाणतीर (टॉर्पेडोज्), हवेतून जमीनीवर मारा करणारी ‘सी स्कुआ’ क्षेपणास्त्रे डागता येतात शिवाय ‘हेवी मशिनगन’ने ती सज्ज आहे.
तत्पूर्वी, २० जानेवारी २२ रोजी मुंबईतील जर्मनीचे महावाणिज्य दूत डॉ. जुर्गेन मोर्हाड यांनी नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे ध्वजाधिकारी व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांची भेट घेतली. त्यांनी ‘मेक इन इंडिया’ संरक्षण तंत्रज्ञान, व्यावसायिक सहकायार्साठी पुढाकार आणि दोन्ही नौदलांमधील सामायिक सागरी हितसंबंध यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली.