Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये अपघातात : ४४ वर्षीय इलेक्ट्रिशियनचा मृत्यू, कामगारांमध्ये संताप

January 23, 2022
in घडलं-बिघडलं
0
electrician dies in Western Railway Lower Parel workshop accident

मुक्तपीठ टीम

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये झालेल्या अपघातात ४४ वर्षीय इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाला. इलेक्ट्रिशियन संतोष गुंजाळ यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद सर्व कामगार आणि कर्मचा-यांमध्ये उमटले आणि सर्वांनी शुक्रवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. या वर्कशॉपमधील ‘आरएसी शॉप’मध्ये  कामगार आणि कर्मचा-यांनी काम बंद केले. वर्कशॉपच्या प्रांगणात अनेक कामगारांनी आपल्या उमद्या सहका-याला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. यामुळे रेल्वे प्रशासनाचे धाबे दणाणले.

electrician dies in Western Railway Lower Parel workshop accident
ही दुर्घटना झाल्याचे कळल्यानंतर प. रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांनी मध्यरात्रीनंतर १ वाजता वर्कशॉपला तातडीने भेट दिली. या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यासाठी कारखाना निरीक्षकांनाही आदेश कन्सल यांनी दिले आहेत.
गुंजाळ १४ जुन २०१३ रोजी ‘ओएच’ कॅटेगरीतंर्गत ग्रेड ‘डी’ मध्ये कामावर रुजू झाले होते आणि १२ जुलै २०१९ रोजी त्यांना कायम स्वरुपी नोकरी मिळाली व त्यांनी ‘टेक्नि ग्रेड ३ ’मध्ये कामाला सुरुवात केली होती. गुरुवारी सायंकाळी ते आरएसी शॉपमध्ये ते काम करत असताना शिडीवरुन खाली पडले आणि त्यांना जबरदस्त मार बसल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. नंतर प. रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात पुढील उपचारांसाठी नेण्यात आले. अपघातानंतर ३० मिनिटे ते रुग्णालयात होते. दुदैवाने सायंकाळी ७ वाजता त्यांची जीवनज्योत मालवली.
गुंजाळ यांना शक्य तितक्या लवकर सर्वोत्कृष्ट वैद्यकीय मदत पुरवली दिली असतानाही ते जबरदस्त दुखापतींमुळे बळी गेले, अशी माहिती त्यांच्या सहका-यांनी दिली. रेल्वेच्या ‘पीसीएमई’ने याप्रकरणी अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.
प. रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी रात्री अपघातस्थळी भेट देऊन दुघर््ाटनेचा आणि कार्यशाळेतील सर्व सुरक्षा व्यवस्थेचा बारकाईने आढावा घेतला. वैद्यकीय मदत वेळेवर उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी चौकशी केली. गुंजाळ यांच्या कुटुंबाला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी महाव्यवस्थापकांनी ‘पीसीएमई’ना आदेश दिले आहेत. दरम्यान, प्रशासनाने मृत कर्मचा-यांच्या कुटुंबीयांना सर्व कायदेशीर फायदे दिले आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


Tags: electricianLower parelSantosh GunjalWestern Railwayइलेक्ट्रिशियनसंतोष गुंजाळ
Previous Post

भारतीय नौदलाचा जर्मन नौदलासोबत होणार सागरी सराव

Next Post

छत्रपतींचे पराक्रमी पितामह! शहाजीराजेंचा वारसा पराक्रमाचा!!

Next Post
shahaji Raje

छत्रपतींचे पराक्रमी पितामह! शहाजीराजेंचा वारसा पराक्रमाचा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!