मुक्तपीठ टीम
गलवान पेचप्रसंगात भारतीय नौदलाने वेगळ्या प्रकारे चिनी नौदलावर दडपण आणले होते. त्याचे प्रतिबिंब दोन देशांमधील चर्चेत उमटले होते. चिनी युद्धनौका भारताच्या सागरी हद्दीच्या आसपास येत असल्या तरी भारतीय नौदलाचे त्यांच्याकडे कसून लक्ष असते. त्याची जाणीवही त्यांना करुन दिली जात आहे. पाकिस्तानकडे आतापर्यंत अपु-या आणि जुन्या युद्धनौका होत्या. मात्र आता त्यांनी मिळतील तेथून नव्या युद्धनौका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांचेही नौदल वाढत असून त्यांच्या युद्धनौकांवर हेलिकॉप्टरही तैनात केली जात आहेत. भारतीय नौदलाची धोरणे ठरविताना या गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात, असेही अजेंद्र सिंह यांनी हा मुद्दा अधोरेखित केला.
पाकिस्तानचा अमली पदार्थांच्या व्यापारात मोठा हात असून, जमिनीवरून हा व्यापार न होता सोप्या समुद्रमागार्ने केला जात आहे. भारतीय नौदलाने आंतरराष्ट्रीय सहकार्य धोरण अवलंबून हा व्यापार रोखण्याची सुरुवात केली आहे. मच्छिमारांनाही प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न सुरु असून, सागरी सुरक्षेला असलेले अन्य धोके निष्प्रभा करण्यात येणार आहेत. त्याकरीता विविध प्रकारे टेहळणी होत आहे, असे ते म्हणाले.
भारतीय नौदल ही सागरी क्षेत्रात एक मजबूत शक्ती आहे आणि आम्ही तेच करण्याचा प्रयत्न केला. आम्ही समुद्रात जे काही आॅपरेशन केले, त्याचा जमिनीच्या सीमेवर निश्चित परिणाम झाला आणि त्यानंतर चर्चा झाली. गेल्या वर्षी जूनमध्ये पूर्व लडाखच्या गलवान खो-यात चिनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक चकमकीत एका कर्नलसह भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले होते.
त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, गलवान संघषार्नंतर नौदलाच्या भूमिकेबद्दल तपशीलवार विचारले असता, व्हाइस अॅडमिरल सिंग यांनी टिप्पणी करण्यास नकार दिला. ‘ मला वाटते की भारतीय नौदल ही सागरी क्षेत्रात एक मजबूत शक्ती आहे आणि आम्ही तेच करण्याचा प्रयत्न केला. आम्ही समुद्रात जे काही आॅपरेशन केले, त्याचा जमिनीच्या सीमेवर निश्चित परिणाम झाला आणि त्यानंतर चर्चा झाली.
व्हा. अॅडमिरल सिंग त्यावर म्हणाले की, “असू देत. वेळ आल्यावर कळेल. तपशीलांबद्दल आम्ही नंतर बोलू शकतो यापैकी काही तपशील गोपनीय आहेत, म्हणून मला येथे चर्चा करायला आवडणार नाही. पण अर्थातच, भारतीय नौदलाने सागरी क्षेत्रात एक मोठा प्रयत्न केला होता, ज्याचा इतरत्र होणा-या वर्तनावर आणि परस्पर संवादावर निश्चित परिणाम झाला होता.”
व्हाईस अॅडमिरल सिंग यांनी सांगितले की, हिंदी महासागरात मोठ्या प्रमाणात चिनी नौका कार्यरत आहेत. यामध्ये युद्धनौका, संशोधन जहाजे, पाण्याखालील सर्वेक्षण जहाजे यांचा समावेश आहे. भारतीय नौदल हिंदी महासागर क्षेत्रातील प्रत्येक चिनी नौकांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या देखरेखीसाठी भरपूर मालमत्तांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बोईंगने भारतीय नौदलासाठी तयार केलेली ‘पी ८ आय ’ही लांब पल्ल्याची, बहु-मिशन सागरी गस्ती विमाने अलीकडेच समाविष्ट केल्याने या दिशेने मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.