Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय नौदलाने मिशन सागरच्या माध्यमातून जगभर केली मदत

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
mission sagar

मुक्तपीठ टीम

जगावर कोरोनाचे संकट कोसळल्यानंतर जगातील अनेक देशांच्या मदतीला आपला देश धावला. या मदतकार्याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदल वैद्यकीय आणि अन्य मदत साहित्य पोहचवण्यासाठी मिशन सागर राबवत आहे. मिशन सागरच्या अंतर्गत मे २०२० पासून भारतीय नौदलाने मदत कार्यास सुरुवात केली. हाती घेतलेल्या मोहमेचा एक भाग म्हणून, भारतीय नौदल जहाज केसरीने २५ डिसेंबर रोजी मोझांबिक येथील मापुटो बंदरात प्रवेश केला. या जहाजातून ५०० टन अन्नधान्य त्या देशातील जनतेसाठी पाठवण्यात आले.

 

आतापर्यंत भारतीय नौदलाच्या आयएनएस ऐरावतने थायलंडमध्ये ऑक्सिजन टॅकर पोहचवले. कोरोना संकटकाळातील मदतीसाठी आयएनएस केसरीने यापूर्वीही काम केले. मालदिव, मॉरिशस, मादागास्कर, कोमोरोस आयलंड आणि सिसेल्स या देशांना ५५ दिवसांची मोहीम राबवत मदत पोहचवली. व्हिएटनामलाही ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता.

 

केसरी या जहाजांची तैनाती भारताचा विस्तारित सागरी शेजार आणि या विशेष संबंधांना भारताने दिलेले महत्त्व अधोरेखित करते.सध्या सुरु असलेल्या दुष्काळ आणि महामारीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मोझांबिक सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याच्या दृष्टीने,आयएनएस केसरीच्या माध्यमातून अन्नाची ५०० टन मदत पाठवण्यात आली आहे. मोझांबिकच्या सशस्त्र दलांच्या क्षमता बांधणीच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.यासाठी आयएनएस केसरीच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली दोन वेगवान इंटरसेप्टर विमाने आणि स्वसंरक्षण उपकरणे मोझांबिकच्या सशस्त्र दलांना सुपूर्द केली जातील.

 

आयएनएस केसरीने, लँडिंग शिप टँक (मोठे), मे – जून २०२० मध्ये मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मादागास्कर आणि कोमोरोस या देशांना मानवतावादी आणि वैद्यकीय सहाय्य प्रदान करण्यासाठी अशाच प्रकारचे अभियान हाती घेतले होते, या अभियानाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी भारतीय नौदलाच्या वैद्यकीय सहाय्य पथकांच्या तैनातीचा समावेश होता.

 

मे २०२० पासून, भारतीय नौदलाने सागर मोहिमांतर्गत १५ मित्र राष्ट्रांमध्ये जहाजे तैनात केली आहेत. समुद्रात २१५ दिवसांपर्यंत असलेल्या या जहाजांच्या तैनातींमुळे एकूण ३,००० मेट्रिक टन पेक्षा जास्त अन्न सहाय्य, ३०० मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन, ९०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि २० आयएसओ कंटेनर्सची मदत दिली आहे.या मोहिमा हाती घेत असताना, भारतीय नौदलाच्या जहाजांनी 40,४०,०० एनएम इतके एकूण अंतर पार केले आहे जे पृथ्वीच्या परिघाच्या जवळपास दुप्पट आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात मानवतावादी सहाय्य वेळेत पोहोचवण्याच्या दृढ हेतूने, भारतीय नौदलाच्या जहाजे आणि किनारी संघटनांच्या कर्मचार्‍यांनी आपल्या मित्र राष्ट्रांना मदत पोहोचवण्यासाठी सुमारे दहा लाख तास काम केले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Indian NavyINS Kesarimission sagarआयएनएस केसरीभारतीय नौदलमिशन सागर
Previous Post

हजारो किलोमीटरचे अंतर पार करत अमूर ससाणा पालघरमध्ये दाखल

Next Post

बजाजही आता ई-वाहनांच्या स्पर्धेत, ईलेक्ट्रिक स्कूटर लॉंच करणार!

Next Post
bajaj electric scooter

बजाजही आता ई-वाहनांच्या स्पर्धेत, ईलेक्ट्रिक स्कूटर लॉंच करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!