मुक्तपीठ टीम
भारताने आज एमआरएसएएम जमिनीवरून हवेतील लक्ष्य साध्य करणाऱ्या मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली. एमआरएसएएम-आर्मी क्षेपणास्त्र प्रणालीच्या क्षेपणास्त्राची चाचणी आयटीआर बालासोर येथे करण्यात आली. डीआरडीओच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रणालीतून निघालेल्या क्षेपणास्त्राने लांब पल्ल्यावरील उच्च गतीचे हवाई लक्ष एकाच वेळी नष्ट केले. या क्षेपणास्त्रामध्ये ७० किमीच्या अंतरापर्यंत येणाऱ्या कोणत्याही शत्रूचे क्षेपणास्त्र किंवा लढाऊ विमान पाडण्याची पूर्ण क्षमता आहे.
एमआरएसएएम क्षेपणास्त्राची इस्रायलच्या सहकार्याने संयुक्तपणे निर्मिती
- या क्षेपणास्त्र प्रणालीला डीआरडीएल हैदराबाद आणि डी्आरडीओ यांनी इस्रायलच्या सहकार्याने संयुक्तपणे बनवले आहे.
- या प्रणालीमध्ये अॅडव्हान्स रडार, मोबाइल लाँचर तसेच कमांड आणि कंट्रोलसह इंटरसेप्टर आहे.
या यंत्रणेची खास वैशिष्ट्ये
- एमआरएसएएमचे वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीपासून आकाशापर्यंत लांब अंतरावरील शत्रूच्या कोणत्याही हवाई हल्ल्याचा सामना करू शकते. ते एका फटक्यात आपले लक्ष्य नष्ट करू शकते.
- यामध्ये कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम, रडार सिस्टीम, मोबाईल लाँचर सिस्टीम, अॅडव्हान्स्ड लाँग रेंज रडार, रिलोडर व्हेईकल आणि फील्ड सर्व्हिस व्हेईकल इत्यादींचा समावेश आहे.