मुक्तपीठ टीम
थेट परदेशी गुंतवणुकीसाठी भारतातून खूप प्रयत्न सुरु असतात, परंतु त्याचवेळी भारतातूनही परदेशात होणारी गुंतवणूक वाढती आहे. यावर्षी मार्चमध्ये भारतीय कंपन्यांची परकीय गुंतवणूक वार्षिक ८.५ टक्क्यांनी वाढून थेट ३.३४ अब्ज डॉलर्स झाली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
मार्च २०२२ मध्ये कुठे किती गुंतवणूक?
- रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार मार्च २०२२मधील एकूण गुंतवणुकीपैकी १.३१ बिलियन अमेरिकन डॉलर गॅरंटी जारी करण्याच्या स्वरुपात केली गेली.
- १.२ बिलियन अमेरिकन डॉलर कर्जाच्या स्वरुपात आणि ८६६.९३ मिलियन अमेरिकन डॉलर्स हे इक्विटीच्या स्वरुपात गुंतवण्यात आले.
- रिझर्व्ह बँकेने सांगितले की, आकडेवारीत बदल होऊ शकतो.
कोणी किती गुंतवणूक केली?
- टाटा कम्युनिकेशन्स, जिंदाल स्टील अँड पॉवर, विप्रो आणि जिंदल सॉ हे प्रमुख गुंतवणूकदार ज्यांनी मार्चमध्ये त्यांच्या परदेशातील उपक्रमांमध्ये भरारी घेतली आहे.
- टाटा कम्युनिकेशन्सने सिंगापूरमध्ये ६९० दशलक्ष डॉलर्स, जिंदाल स्टील आणि पॉवरने मॉरिशसमध्ये ३६६ दशलक्ष डॉलर्स, विप्रोने सायप्रसमध्ये २०४.९६ दशलक्ष डॉलर्सआणि जिंदाल सॉने संयुक्त अरब अमिरातीमध्ये ६४.५० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक केली आहे.प्रत्येकाने त्यांच्या WOS कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले.
- रेस्टॉरंट ब्रँड Aisa आणि Lupin Ltd. यांनी अनुक्रमे इंडोनेशिया आणि अमेरिकामध्ये त्यांच्या संयुक्त उपक्रमांमध्ये १४१.३४ दशलक्ष डॉलर्स आणि १३१.२५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्याच वेळी, डेटानुसार, रिलायन्स न्यू एनर्जीने नॉर्वेमधील WOS मध्ये ८७.७३ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
- मोहल्ला इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड ने मॉरिशस संपूर्ण मालकीच्या संस्थेमध्ये ८६ दशलक्ष डॉलर्स गुंतवले आणि ONGC ने रशियामधील संयुक्त उपक्रमात ८३.३१ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.