मुक्तपीठ टीम
भारतीय तटरक्षक दलात जनरल ड्युटी नाविक या पदावर २२५ जागा, डोमेस्टिक ब्रॅंच नाविक या पदावर ४० जागा, मेकॅनिकल यांत्रिक या पदावर १६ जागा, इलेक्ट्रिकल यांत्रिक या पदावर १० जागा, इलेक्ट्रॉनिक्स यांत्रिक या पदावर ०९ जागा अशा एकूण ३०० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- जनरल ड्युटी नाविक- गणित आणि भौतिकशास्त्र विषयात १२वी उत्तीर्ण
- डोमेस्टिक ब्रॅंच नाविक- १०वी उत्तीर्ण
- यांत्रिकी पद- १) १०वी/ १२वी उत्तीर्ण २) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/ पॉवर) या विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २१ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून २५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट https://joinindiancoastguard.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1t8j4I5zesH17UMRGYnn1_W3_MtPZXmzH/view