Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रासह ८ राज्यांमधील दुर्गम भागातील ७५ गावांपर्यंत पोहोचण्यासाठी लष्कराचे आऊटरिच अभियान

December 30, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Indian Army outreach campaign

मुक्तपीठ टीम

राष्ट्र उभारणीप्रती असलेली कटिबद्धता दर्शवत, भारतीय लष्कराने दक्षिणी कमांडच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा,कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांच्या दुर्गम भागात असलेल्या ७८ गावांपर्यंत पोहोचण्यासाठी ३० डिसेंबर २०२२ रोजी मोठ्या प्रमाणात आऊटरिच अभियान राबविण्याचे नियोजन केले आहे.  बेंगळूरू येथे येत्या १५ जानेवारी २०२३ रोजी साजऱ्या होणाऱ्या ७५व्या लष्कर दिन संचलनाच्या तयारीच्या दृष्टीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेतील हा तिसरा उपक्रम आहे.

‘ग्राम सेवा-देश सेवा’ या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाअंतर्गत, नव्याने सुरु करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेसंदर्भात जागरूकता मोहिमा राबविण्यासाठी  भारतीय लष्करातील कर्मचारी ७५ दुर्गम खेड्यांना भेट देणार आहेत. तसेच, या भेटीदरम्यान, स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लष्कराचे जवान या गावांमध्ये स्वच्छता मोहीम देखील राबविणार आहेत. तसेच हे जवान, या गावांमध्ये व्हॉलीबॉल, खो-खो आणि कबड्डी या खेळांसाठी क्रीडा सुविधा निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करतील तसेच त्या भागांतील युवक आणि विद्यार्थ्यांचे मैत्रीपूर्ण सामने आयोजित करतील. तेथील वीर नारींसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी देखील भारतीय लष्कराकडून प्रयत्न करण्यात येतील. या गावांतील स्थानिक नागरिकांसोबत भोजनाचा आनंद घेणे आणि त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत एकोप्याचा संदेश पोहोचवून या देशाविषयी आपलेपणाची भावना निर्माण करण्याची योजना देखील लष्करातील कर्मचाऱ्यांनी आखली आहे.

देशाप्रती अधिक मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा भाग म्हणून, भारतीय लष्कर नेहमीच देशातील गावांचे स्वास्थ्य, विकास आणि प्रगती साधण्यासाठी वचनबद्ध आहे. देशाच्या ग्रामीण भागातील लोकांना सर्वांशी जोडून घेण्यासाठी तसेच गावातील लोकांच्या जीवनाचा दर्जा उंचावून त्यांच्या चेहेऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी टाकलेले पाऊल म्हणून हा आऊटरिच कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.


Tags: good newsGood news MorningIndian ArmyIndian Army outreach campaignग्राम सेवा-देश सेवालष्कराचे आऊटरिच अभियान
Previous Post

RBI दक्ष : ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेची नवी यंत्रणा

Next Post

महाराष्ट्रातील तीन साहित्य‍िकांना साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान

Next Post
Yuva Arpan Award

महाराष्ट्रातील तीन साहित्य‍िकांना साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!