Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लष्कराचे पुण्यात पहिले तंत्रज्ञान नोड, स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना आणि उद्योगांशी सुसंवाद!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Army's first technology node in Pune

मुक्तपीठ टीम

स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि उद्योगांशी सुसंवाद साधण्यासाठी, भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने 2 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित कार्यक्रमात पुणे येथे पहिल्या प्रादेशिक तंत्रज्ञान नोडचा (RTN – रिजनल टेक्निकल नोड) औपचारिक प्रारंभ केला. यामध्ये सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या (SIDM) स्टार्ट -अप मंच देखील समाविष्ट होता.

 

हा कार्यक्रम दक्षिण कमांडच्या मुख्यालयाने एसआयडीएम च्या सहकार्याने आयोजित केला होता. आभासी आणि प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित, हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित करण्यात आला आणि देशभरातील 100 हून अधिक उद्योग, स्टार्ट-अप आणि लष्करी आस्थापनांचे प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, एव्हीएसएम, एसएम, जीओसी-इन-सी दक्षिण कमांड, यांनी आपल्या बीजभाषणात सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वेळेवर आत्मसात करणे, संरक्षण सामुग्री निर्मितीत आत्मनिर्भर होणे आणि भारतीय उद्योगाच्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी उद्योगांना त्यांचे प्रस्ताव घेऊन या प्रक्रियेत भागीदार बनण्याचे आवाहन केले. यावेळी एसआयडीएमचे अध्यक्ष जयंत डी पाटील, मेजर जनरल कीर्ती जौहर, व्हीएसएम, आर्मी डिझाईन ब्युरोच्या अतिरिक्त महासंचालक, एस.पी. शुक्ला, उपाध्यक्ष एसआयडीएम , एसआयडीएम स्टार्ट-अप फोरमचे अध्यक्ष अभिषेक जैन आणि कर्नल राजिंदर सिंग भाटिया (निवृत्त), अध्यक्ष आणि सीईओ संरक्षण, भारत फोर्ज लिमिटेड आदी मान्यवर उपस्थित होते.

 

सरकारच्या आत्मनिर्भरता आणि मेक इन इंडिया उपक्रमाला अनुसरून, संरक्षण मंत्रालय आणि लष्कराने परदेशी पुरवठादारांवरील अवलंबत्व कमी करण्याच्या उद्देशाने संरक्षण उपकरणांच्या स्वदेशीकरणात मोठी भरारी घेतली आहे आणि संरक्षण सामुग्रीचे निर्यात केंद्र म्हणून उदयास येत आहे. पुणे येथे आरटीएनचा प्रारंभ झाल्यामुळे सैन्य संरचना विभागाची व्याप्ती दक्षिणेकडील टेक हबपर्यंत विस्तारली आहे. यामुळे उद्योग, एमएसएमई आणि स्टार्ट-अपना पुढे येण्यासाठी आणि लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या गरजांवर उपाय सुचवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.


Tags: indian Army'smuktpeethnodepuneतंत्रज्ञान नोडपुणेभारतीय लष्करमुक्तपीठस्वदेशी संरक्षण
Previous Post

विधवांची लक्ष्मी म्हणून पूजा करत परंपरेला जोरदार धक्का!

Next Post

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ११७ जागांसाठी अॅप्रेंटिसशिप संधी

Next Post
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ११७ जागांसाठी अॅप्रेंटिसशिप संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!