Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत x चीन: जाणीवपूर्वक कसा काढतो चीन कुरापती? आता यांगत्सेमध्ये का घुसखोरी?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Tawang Clash

मुक्तपीठ टीम

भारतात तवांग चकमकीबाबत चीनविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. भारताने चीनच्या कुरापतखोरीविरोधात जोरदार निषेध नोंदवला आहे. सत्ताधारी भाजपा आणि विरोधातील काँग्रेस आणि अन्य पक्ष चीनविरोधात एकजुटीने बोलत असले तरी त्यांच्यातही आकोप प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेेल्या यांगत्से भागाविषयी जाणून घेतानाच भारत चीन तणावाचा इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न…

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. चिनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. पण एलएसीवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी त्यांचा पाठलाग केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चिनीचे ३००हून अधिक सैनिक एलएसीवरील वादग्रस्त भागात घुसले होते. भारतीय लष्कराच्या जवानांनी पीएलएला चोख प्रत्युत्तर देत त्यांचा पाठलाग केला. या चकमकीत भारतीय लष्कराचे काही जवान जखमी झाले आहेत.

अरुणाचल फ्रंटियर हायवे बनवायची योजना आहे, ब्रह्मपुत्रेच्या आत बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सीमा भागात होत असलेल्या विकासाची चीनला चिंता आहे. भारताच्या सीमाभागाचा विकास चीनला आवडत नाही. असे अनेक प्रकल्प सुरू आहेत.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पुन्हा का वाढला तणाव ?

भारताची चीनशी ३ हजार ४८८ किमी लांबीची सीमा आहे. पूर्वेकडील चीनची सीमा १ हजार ३४६ किमी लांबीची आहे. यामध्ये अरुणाचल आणि सिक्कीमच्या सीमेचा समावेश आहे. अरुणाचल हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे.

१९१४मध्ये ब्रिटीश सरकारने चीन आणि तिबेट यांच्यात शिमला करार केला. या करारात अरुणाचल हा भारताचा भाग असल्याचे नमूद करण्यात आले होते. जे स्वीकारण्यास चीनने नकार दिला. तेव्हापासून चीनच्या कारवाया अव्याहतपणे सुरू आहेत.

चीनला यांगत्सेमध्ये रस का आहे?

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात यापूर्वीही भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्येही दोघांमध्ये वाद झाला होता. वास्तविक, चीनला यांगत्सेचे १७,००० फूट उंच शिखर काबीज करायचे आहे. हे शिखर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. ही उंची नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंच्या कमांडिंग पोझिशन मिळवून देते, ज्यामुळे सीमेच्या दोन्ही बाजूंवर लक्ष ठेवणे सोपे होते.

भारत-चीन संबंधातील तणाव…

  • १९५९- भारताने दलाई लामांना दिलेलाआश्रय
  • १९६२- भारत आणि चीनमध्ये युद्ध
  • १९६७- भारतीय सैनिकांवर चीनचा हल्ला
  • १९७५- भारत आणि चीन यांच्यात भीषण संघर्ष
  • १९८७- तवांगच्या उत्तरेला तणाव
  • २०१७- डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैनिक ७३ दिवस आमनेसामने
  • २०२०- गलवानमध्ये हिंसक संघर्ष
  • २०२२- चिनी सैनिकांचा तवांगमध्ये घुसखोरीचा अयशस्वी प्रयत्न

Tags: Arunachal PradeshchinaIndiaIndia-China ConflictmuktpeethTawangTawang ClashYangtseअरुणाचल प्रदेशघडलं-बिघडलंचीनतवांगतवांग चकमकभारतभारत-चीन संघर्षमुक्तपीठयांगत्से
Previous Post

जी-२० प्रतिनिधींना महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख! हॉटेल ताज पॅलेस येथे दिमाखदार आयोजन!!

Next Post

“पंतप्रधान मोदी शी जीनपिंगना भेटतात, तरीही चीन भारतीय भूमीत का घुसखोरी करतो? स्पष्ट बोला!” खरगेंचे रोखठोक प्रश्न

Next Post
mallikarjun kharge

"पंतप्रधान मोदी शी जीनपिंगना भेटतात, तरीही चीन भारतीय भूमीत का घुसखोरी करतो? स्पष्ट बोला!" खरगेंचे रोखठोक प्रश्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!