मुक्तपीठ टीम
चीन आणि पाकिस्तानपासून होऊ शकणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी भारत स्वत:चं प्रत्येक क्षेत्रातील बळ वाढवत आहे. लवकरच हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्र मार्क -२ या मिसाइलची चाचणी केली जाणार आहे. हे मिसाइल १६० किलोमीटर वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावते. या घातक मिसाईलमुळे भारत हवाई युद्धाच्या बाबतीत पाकिस्तान आणि चीनला मागे टाकेल. लांब पल्ल्याच्या या लक्ष्यवेधी क्षमतेनुसार अस्त्र मार्क-२ मिसाईल हे नजरेच्या टप्प्यापलिकडेही शत्रू विमानांना लक्ष्य करण्यात सक्षम असेल.
लढाऊ विमानांची क्षमता वाढेल
• अस्त्र मार्क २ मिसाइलमुळे आपल्या लढाऊ विमानांची क्षमता हवाई हल्ल्यामध्ये अधिक घातक बनेल.
• २६ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये भारतीय हवाईदलाने अशाच मिसाइलचा वापर केला होता.
• या मिसाईलने सज्ज असलेले भारतीय विमान १६० किलोमीटर अंतरावरुन शत्रूच्या विमानांवर हवेतून हवेत मारा करण्यासाठी सक्षम असेल.
अस्त्र मार्क -२ २०२२पर्यंत हवाई दलाच्या ताब्यात
• ध्वनीच्या गतीपेक्षा चार पट वेगवान
• अॅस्त्र मार्क २ मिसाईल ध्वनीच्या वेगापेक्षा चार पट वेगवान उड्डाण करते.
• स्वदेशी लढाऊ विमान तेजसवर १०० कि.मी.हून अधिकची स्ट्राइक रेंज देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
• हे मिसाईल प्रत्येक वातावरणात, दिवस आणि रात्र युद्ध करण्यास सक्षम आहे.
• सध्याच्या मिसाइलची रेंज सुमारे १०० किलोमीटर आहे.
• सध्या रशिया, फ्रान्स आणि इस्रायलकडून महागड्या ‘बीव्हीआर’ मिसाइल वापरले जातात.
• अस्त्र मार्क -२ हे आयात केलेल्या मिसाईलची ची जागा घेईल
पाहा व्हिडीओ: