Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत गगनयानातून असीम अंतराळात झेपावणार आणि अथांग समुद्रातही डोकावणार!

June 10, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
ISRO Gaganyan Human Space mission

मुक्तपीठ टीम

येणारं २०२३ हे वर्ष भारतासाठी खूपच महत्वाचं ठरणार आहे. येत्या वर्षी भारत ‘गगनयान’ ही पहिली मानवी अंतराळ मोहीम आणि पहिली मानवी महासागरी मोहीम या दोन्हींचा एकाच वेळी प्रारंभ करणार आहे. त्यामुळे एकाचवेळी असीम अंतराळ झेपावतानाच अथांग समुद्रात डोकावण्याची एकमेवाद्वितीय कामगिरी भारत करून दाखवणार आहे. अंतराळ मोहीम आणि महासागरी मोहीम या दोन्ही मानवी मोहिमांच्या चाचण्या आता प्रगत टप्प्यावर पोहोचल्या आहेत. पुढच्या वर्षाच्या उत्तरार्धात या दोन मोहिमा केल्या जाण्याची शक्यता आहे.

मानवी जलमग्न यानाच्या समुद्री चाचण्या २०२३च्या सुरुवातीला होण्याची अपेक्षा आहे. ही ५००मीटर पर्यंतची उथळ पाण्यासाठीची आवृत्ती असेल. त्यानंतर ‘मत्स्य ६०००’ हे खोल पाण्यातील मानवी जलमग्न यान २०२४च्या दुसऱ्या तिमाहीत चाचणीसाठी तयार असेल, अशी माहिती केंद्रीय पृथ्वीविज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली. त्याचप्रमाणे, गगनयानाच्या महत्त्वाच्या मोहिमाही आहेत. त्यातील यानातील व्यक्तींना संकटकाळी बाहेर पडू देणाऱ्या प्रणालीची चाचणी आणि गगनयानची पहिली मानवविरहित मोहीम जी-1 या दोन्ही मोहिमा २०२२च्या उत्तरार्धात होणार आहेत. त्यानंतर २०२२च्या अखेरीस दुसरी मानवविरहित मोहीम असेल. त्यामध्ये इस्रोने तयार केलेला ‘व्योममित्र’ नावाचा यंत्रमानव प्रवास करेल. आणि त्यानंतर २०२३मध्ये गगनयानची पहिली मानवी अंतराळ मोहीम काढण्यात येईल.

सरकार लवकरच ‘नील अर्थव्यवस्था धोरण’ आणणार असल्याची घोषणा यावेळी डॉ.सिंग यांनी केली. वर्ष २०३०पर्यंत अंदाजे ४ कोटी लोकांना महासागरावर आधारित उद्योगांतून रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी लाल किल्ल्याच्या बुरुजावरून पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ डॉ. सिंग यांनी दिला. “खोल महासागरी मोहीम म्हणजे, महासागरातील अथांग संधींचा शोध घेण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेचा परिपाक आहे. सागरात दडलेली खनिजसंपदा, सागरजलातील औष्णिक विद्युत, अशा साधनसंपत्तीमुळे देशाच्या विकासाला नवी उंची प्राप्त होईल”, असे पंतप्रधान म्हणाले होते. त्याचा संदर्भ देऊन डॉ.सिंग म्हणाले की, येत्या पंचवीस वर्षांच्या अमृतकाळात संशोधन आणि विकास तसेच उत्खनन यांद्वारे स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत मोलाची भर पडेल.

अंतराळ क्षेत्र खुले करण्याचा आणि त्यात खासगी गुंतवणुकीला वाव दिल्याचा उपयोग करून घेत, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वाणिज्यिक विभागाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव त्यांनी बोलून दाखवला.”भारतातील सागरी उद्योगाने आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर केला पाहिजे. महासागरांतून सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही प्रकारच्या साधनसंपत्ती मिळतात. त्यामुळे मत्स्यव्यवसायापासून ते जैवतंत्रज्ञानापर्यंत, खनिजांपासून ते पुनर्नवीकरणक्षम ऊर्जेपर्यंत अनेक संधी यातून मिळू शकतात. तसेच सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील उपयुक्त अशा सेवा- पर्यटन, मनोरंजन, सागरी वाहतूक, सुरक्षा, किनारी जपणूक- यांच्या क्षेत्रातही पुष्कळ संधी आहेत”, असे त्यांनी सांगितले.

खोल महासागरी मोहीम (DOM) पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने राबवावी अशी संमती गेल्यावर्षीच्या जून महिन्यात देत सरकारने त्यासाठी पाच वर्षांच्या काळाकरिता एकूण ४,०७७कोटी रुपये मंजूर केले, अशी माहितीही त्यांनी दिली.

मोठ्या माशांची संख्या ९०% नी कमी झाल्याच्या तसेच प्रवाळ बेटांचा ५०% विनाश झाल्याच्या वृत्ताबद्दल डॉ.सिंग यांनी चिंता व्यक्त केली. “येथून पुढे महासागरांतून साधनसंपत्ती मिळविताना नव्याने समतोल राखण्याची गरज आहे, जेणेकरून त्याचे सौंदर्य व संपदा यांना हानी पोहोचणार नाही, उलट त्याचे चैतन्य परतेल आणि त्याला नवजीवन मिळेल”, असे डॉ.जितेंद्र सिंग म्हणाले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: GaganYangood newsGood news MorningIndiaISRO Gaganyan Human Space Missionगगनयानभारतमानवी अंतराळ मोहीममानवी महासागरी मोहीम
Previous Post

साताऱ्यातील प्रशिक्षणार्थींच्या बसला हिमाचलप्रदेशात अपघात, रावसाहेब दानवेंच्या मदतीनं सुखरुप घरी!

Next Post

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन IBPSमध्ये करिअर संधी…लवकर करा अर्ज!

Next Post
IBPS

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन IBPSमध्ये करिअर संधी...लवकर करा अर्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!