Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२०३० पर्यंत भारत आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार!

आयएचएसचा अंदाज

January 16, 2022
in चांगल्या बातम्या
0
graph

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या प्रादुर्भावाने जगभरात महामारी पसरलेली आहे. आर्थिक संकट निर्माण झाले आहे. तरीही २०३० पर्यंत भारत आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटन आणि जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा दावा आयएचएस मार्किटने जारी केलेल्या अहवालात केला आहे.

 

आयएचएस मार्केटच्या मते, भारताचा जीडीपी सध्या अमेरिका, चीन, जपान, जर्मन आणि ब्रिटननंतर सहाव्या क्रमांकावर आहे. मूल्याच्या दृष्टीने, २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार २७ अब्ज होता, जो २०३० पर्यंत ८४ अब्जापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ही वाढ जपानला मागे टाकण्यासाठी पुरेशी आहे, ज्यामुळे भारत २०३० पर्यंत आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.

 

भारताचा विकास दर २०२१-२२ मध्ये ८.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर मागील आर्थिक वर्षात ७.३ टक्के घट झाली होती. तसेच, चालू आर्थिक वर्षातील गती २०२२-२३ मध्येही कायम राहील आणि भारत ६.७ टक्के विकास साधेल.

 

भारताचा विकास दर वाढवण्यात ई-कॉमर्स क्षेत्रासह उत्पादन, पायाभूत सुविधा आणि सेवा क्षेत्राची मोठी भूमिका आहे. इतकेच नाही तर वाढत्या डिजिटलायझेशनमुळे आगामी काळात ई-कॉमर्स मार्केट मोठे होणार आहे. एका अहवालानुसार २०३० पर्यंत १.१ अब्ज भारतीयांकडे इंटरनेट असेल, २०२० मध्ये ही संख्या ५०० दशलक्ष होती.

 

येत्या १० वर्षात भारताचा विकास दर सर्वात जास्त असणार

  • आयएचएस मार्किटने असा दावा केला आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेचे एकंदरीत भवितव्य भक्कम आणि स्थिर दिसत आहे.
  • यामुळे पुढील १० वर्षात भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या जीडीपीचा देश बनूण राहील.
  •  दीर्घकाळात, पायाभूत सुविधा क्षेत्र आणि स्टार्टअप्स सारखा तांत्रिक विकास भारताचा वेगवान विकास दर टिकवून ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावतील.

 

भारताला सर्वात जास्त मदत त्याच्या मोठ्या प्रमाणातील मध्यमवर्गाकडून मिळते, जी त्याची मुख्य ग्राहक शक्ती आहे. पुढील येत्या १० वर्षात भारतीय ग्राहकांचा खर्चही दुप्पट होईल, असा अंदाज आयएचएस मार्किटने वर्तवला आहे. हे २०२० मध्ये १५ अब्ज वरून २०३० मध्ये ३० अब्जपर्यंत वाढू शकते.

 


Tags: Asiagood newsIHS MarketIndiaIndia's growth rateIndian Economymuktpeethआयएचएस मार्किटआशियाचांगल्या बातम्याभारतभारताचा विकास दरभारतीय अर्थव्यवस्थामुक्तपीठ
Previous Post

महिला शेतकरी, शेतमजुरांनाही राज्याचे कृषी खाते प्रशिक्षण देणार

Next Post

एक ऑक्टोबरनंतर उत्पादित कार-एसयूव्हीमध्ये मागेही ‘या’ एअर बॅग्स बंधनकारक

Next Post
airbags car

एक ऑक्टोबरनंतर उत्पादित कार-एसयूव्हीमध्ये मागेही ‘या’ एअर बॅग्स बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!