मुक्तपीठ टीम
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. बुधवारी पेट्रोलची किंमत १०० रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल १००.७ रुपयांवर पोहोचले आहे. globalpetrolprices.com ने दिलेल्या माहितीनुसार, शेजारील देश पाकिस्तानमध्ये पेट्रोल अर्ध्या दराने म्हणजे ५१.१४ रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. दुसरीकडे चीनमध्ये ते प्रति लिटर ७४.७४ रुपये आहे.
जगातील सरासरी पेट्रोलची किंमत ७८.६५ रुपये लीटर
भारतीय रुपयांनुसार, जगात पेट्रोलची किंमत प्रति लीटर सरासरी ७८.६५ रुपये आहे. अरुणाचल प्रदेशाची राजधानी इटानगरमध्ये भारतातील सर्वात स्वस्त पेट्रोल ८३.१९ रुपयांपर्यंत विकले जाते. दिल्लीत त्याची किंमत ८९.५४ रुपये प्रतिलिटर आहे, म्हणजे पेट्रोल हे भारतात जागतिक सरासरी किंमतीपेक्षा महाग आहे.