Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतातील औद्योगिक जमिनींची संपूर्ण माहिती बसल्या जागी देणारी लँड बँक

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
India industrial land bank

मुक्तपीठ टीम

भारतातील औद्योगिक जमीन खरेदी विक्रीसाठी सरकारने इंडिया इंडस्ट्रियल लँड बँक (आयआयएलबी) एक जीआयएस-आधारित पोर्टल सुरु केले आहे. हे पोर्टल कनेक्टिव्हिटी, इन्फ्रा, नैसर्गिक संसाधने आणि भूभाग, रिक्त भूखंडांवरील भूखंड -स्तरीय माहिती, उपक्रमांचा मार्ग आणि संपर्काची माहिती इत्यादी सर्व औद्योगिक पायाभूत सुविधांशी संबंधित माहितीचे भांडार आहे. बसल्या जागी अशा जमिनींची संपूर्ण माहिती मिळत असल्यानं अमेरिकेसह जगभरातून लँडबँकेच्या वेबपोर्टलला आणि अॅपला मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे.

 

लँड बँकेकडे आहे काय?

• सध्या आयआयएलबीकडे ५.५ लाख हेक्टर क्षेत्रावर अंदाजे ४,००० औद्योगिक पार्क आहेत.
• ते दूरस्थपणे जमीन शोधण्यासाठी गुंतवणूकदारांना निर्णय घेण्यासाठी माहिती पुरवणारा आधार म्हणून काम करतात.
• रिअल-टाइम आधारावर अद्ययावत केलेल्या पोर्टलवर तपशील देण्यासाठी ही प्रणाली सध्या १७ राज्यांच्या उद्योग-आधारित जीआयएस प्रणालीशी जोडली गेली आहे.
• डिसेंबर २०२१पर्यंत ती देशभरात जोडली जाईल.

 

लँड बँकेचे यूजर फ्रेंडली अॅप

• लॉगिन आवश्यक नसलेले एक मोबाइल अॅप Android आणि iOS स्टोअरवर लाँच केले गेले आहे.
• लवकरच त्यात अतिरिक्त वैशिष्ट्ये उपलब्ध केली जातील.
• त्याचबरोबरीने वापरकर्त्यांना कोणत्याही लॉगिनशिवाय पोर्टल वापरण्याची परवानगी देऊन पोर्टल अधिक य़ूजर फ्रेंडली बनविले आहे.
• वापरणाऱ्यांना अधिक चांगला अनुभव मिळण्यासाठी पोर्टलचे डिझाइन आणि यूआय सतत सुधारले जात आहे.

 

लँडबँकेला वाढता प्रतिसाद

  • संकेतस्थळ वापरकर्त्यांच्या संख्येत एप्रिल २०२१ पासून प्रत्येक महिन्यामध्ये ३०% वाढ झाली आहे.
  • मे २०२१ मधील ४४१३६ यूजर्स आणि एप्रिल २०२१ मधील ३०१५३ यूजर्स यांच्या तुलनेत जूनमध्ये ५५,००० जणांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे.
  • मागील तिमाहीत (एप्रिल – जून २०२१) एकूण यूजर्स १३,६१० होते ज्यांपैकी १२,९९६ असे आगळेवेगळे यूजर्स होते ज्यांनी अंदाजे १.३ लाख पृष्ठ बघितली.

 

जगभरात लँड बँकेचे यूजर्स

• देशानुसार संकेतस्थळ बघणाऱ्यांमध्ये, भारतानंतर, अमेरिकेतील यूजर्स सर्वाधिक आहेत.
• त्याखालोखाल ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सिंगापूर, युएई, जर्मनी आणि इंडोनेशियाचा समावेश आहे.
• इंडस्ट्री असोसिएशन, सिंगापूर इंडियन हाय कमिशन, कोरीयाचे भारतीय दूतावास, कोट्रा आणि मलेशियन व कोरियन गुंतवणूकदारांना आयआयएलबी पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशन चे प्रात्यक्षिक विविध कार्यक्रमाद्वारे देण्यात आले.

 

उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या मुख्यपृष्ठाद्वारे देखील लँड बँकेची माहिती उपलब्ध आहे. औद्योगिक माहिती प्रणालीवर क्लिक केल्यावर गुंतवणूकदारांच्या तपशीलवार प्रवेशासाठी पृष्ठास https://iis.ncog.gov.in/parks/login1 वर रिडायरेक्ट केले जाईल. याव्यतिरिक्त, लँड बॅंकेसंबंधी माहिती इंडिया इन्स्टस्ट्रियल लँड बँक म्हणून रिसोर्स टॅब अंतर्गत इन्व्हेस्ट इंडिया संकेतस्थळावर देखील प्राप्त होऊ शकते.


Tags: AndroidIndia industrial land bankआयआयएलबीइंडिया इन्स्टस्ट्रियल लँड बँक
Previous Post

सोन्यापेक्षा तशीच फायदेशीर बचत करा सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत!

Next Post

प्राचार्यांच्या ३६३ जागांसाठी यूपीएससीची अधिसूचना, २९ जुलैपर्यंत मुदत

Next Post
UPSC

प्राचार्यांच्या ३६३ जागांसाठी यूपीएससीची अधिसूचना, २९ जुलैपर्यंत मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!