मुक्तपीठ टीम
भारताची पहिली ईलेक्ट्रिक सुपर कार लवकरच लाँच होणार आहे. बंगळुरुमधील मीन मेटल मोटर्स ही स्टार्टअप कंपनी या सुपर कार प्रकल्पावर काम करत आहे. त्यामुळे वेग आणि सुपर चार्जिंगचा योग जुळून भारताची स्वत:ची पहिली ईलेक्ट्रिक सुपर कार लाँच होण्याची शक्यता आहे. या सुपर कारचं नाव अझानी आहे. दिसायला ही कार मॅक्लेरन सुपर कारसारखी दिसते.
सुपर कारचे सुपर फिचर्स
- यात आकर्षक फ्रंट लूक असलेले पॅनल्स पूर्णपणे झाकलेले आहेत.
- कारचे एलईडी हेडलॅम्प त्याच्या मोठ्या बाजूच्या एअर व्हेंट्समध्ये लावण्यात आले आहेत. यात युनिक स्टेअरिंग, ऑल-ब्लॅक कॉकपिट आणि एरोडायनामिक टेल सेक्शन आहे.
- त्याला टेललाइट्सच्या रूपात एक आकर्षक एलईडी पट्टी मिळते.
Indian automotive will change forever.
Be a part of the change.Visit Fundable https://t.co/RM1xhbyxXa#electricautomotive #electriccar #electricvehicles #emobility #deeptech #eauto #technology #batterytech #webringthefuture #invest #meanmetalmotors #tomorrowishere #azani #mmm pic.twitter.com/aQ0sVIOiDN
— Mean Metal Motors (@MeanMetalMotors) August 5, 2021
२ सेकंदात १०० किमीचा स्पीड
- कंपनीच्या दाव्यानुसार, अझानी सुपरकार ३५० किमी प्रति तासच्या टॉप स्पीडसह येते.
- दोन सेकंदांपेक्षा कमी वेळात ०-१०० किमी प्रतितास वेग वाढवते.
- ही सुपरकार १,००० hp हून अधिकच्या इलेक्ट्रिक मोटरपेक्षा पॉवरफूल आहे.
- कंपनीचा दावा आहे की ती एका चार्जवर ७०० किमी पर्यंत धावेल.
पुढच्या वर्षी सुपरकार बाजारात
- या स्टार्टअप कंपनीचा दावा आहे की ते २०२२ च्या दुसऱ्या सहामाहीत त्याचा पहिला प्रोटोटाईप आणणार आहेत.
- कारची किंमत $ १२०,००० (सुमारे ८९ लाख रुपये) असेल.
- कंपनीने २०३० पर्यंत ३४ दशलक्ष ईव्हीसह ७५० अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे.