Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘मेड इन इंडिया’ मोबाइल अॅप्ससाठी भारताचे खास प्ले स्टोर

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Indian App

मुक्तपीठ टीम

जगात मोबाइल अॅपचा सर्वाधिक वापर हा भारतात होतो. मात्र, या बाजारपेठेवर वर्चस्व किंवा नियंत्रण आहे ते गूगल आणि अपलसारख्या परदेशी कंपन्यांचं. त्यामुळेच भारताने आता मेड इन इंडिया अॅपचे स्वत:चे अॅप स्टोर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपच्या लाखो कोटी रुपयांच्या व्यवहारात भारताला मोठा वाटा मिळण्यासाठी डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत सरकार भारतीय अॅप निर्मात्यांना प्रोत्साहन देत आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे भारतातील मेड इन इंडिया मोबाइल अॅप्सच्या विकासाला वेग आला आहे. सरकारची आशा आहे की, “मेड इन इंडिया” मोबाइल अॅप्स जगातील अव्वल अॅप्सशी स्पर्धा करू शकतील.

 

सध्या गूगल आणि अॅपल सारख्या कंपन्याचे भारतात अ‍ॅप स्टोअरमधील अॅप्सवर संपूर्ण नियंत्रण आहे. इंटरनेटच्या जगात कोणत्याही एका कंपनीची एकाधिकारशाह राहू दिली जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. स्वदेशी अ‍ॅप स्टोअर विनामूल्य ठेवले जाईल.. गूगलसारख्या कंपन्या सध्या अ‍ॅप निर्मात्यांकडून मोठे शुल्क आकारतात. तसेच पेटीएम सारख्या अ‍ॅप्सने गुगलच्या मक्तेदारीविरूद्ध आवाज उठविला आहे.

रविशंकर प्रसाद यांनी २०२१ च्या इंडिया अ‍ॅप मार्केट स्टॅटिस्टिक्स रिपोर्टनुसार म्हटले आहे की, “अॅन्ड्रॉइड अॅप स्टोअरचे पाच टक्के अ‍ॅप भारतीय डेव्हलपर्सनी तयार केले आहेत. यामुळेच सरकार आपले मोबाइल सेवा अ‍ॅप स्टोअर सुरू करत आहे. या सरकारी अ‍ॅप स्टोअरवर खासगी अ‍ॅपही उपलब्ध आहे. मोबाइल सेवा अॅप स्टोअर हे भारतातील पहिले स्वदेशी अ‍ॅप स्टोअर आहे, जिथे विविध डोमेन आणि जन सेवा कॅटेगरीतील ९६५ पेक्षा जास्त मोबाइल अॅप्स आहेत. सरकार मोबाइल सेवा अॅप स्टोअर विनामूल्य अ‍ॅप ठेवेल. एकूण ८.६५ कोटी लोकांनी हे अ‍ॅप स्टोअर डाउनलोड केले.

मेक इन इंडिया अ‍ॅपला प्रोत्साहित करण्यासाठी केंद्राने आत्मनिर्भर भारत मोबाइल अॅप इनोवेशन चॅलेंज सुरू केले होते, ज्यात ६,९४० अ‍ॅप डेव्हलपर होते. या चॅलेंजच्या विजेत्यांना आर्थिक सहाय्य देखील देण्यात आले. अ‍ॅप तयार करताना सरकार ‘मेसेजिंग अॅन्ड कॉलिंग अ‍ॅप्स’ च्या सायबर सिक्युरिटीबाबत सावध आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, ज्यांचे अॅप्स धोकादायक असतील त्यांना प्रोत्साहन दिले जाणार नाही.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: googleअॅप स्टोरगूगलमेड इन इंडियामोबाइल अॅप
Previous Post

तुटलेली हाडे मजबूत जोडणाऱ्या हलक्या इम्पांटचा भारतात शोध

Next Post

उत्तर मध्य रेल्वेत अॅप्रेंटिसशिपच्या ४८० जागांची संधी

Next Post
North Central Railway

उत्तर मध्य रेल्वेत अॅप्रेंटिसशिपच्या ४८० जागांची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!