कोरोनाच्या संकट काळात सर्व क्षेत्रातील कामकाज ठप्प झालं आहेत. देशाचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नागरिकांना या काळात सोयी पुरवण्याचे काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संबोधताना ‘कोरोना ही एक आपत्ती असली तरी या आपत्तीला संधीमध्ये बदला’ असे सांगितले होतं. याच आपत्तीला संधीमध्ये बदलण्याची तयारी टुरिझम इंडस्ट्री करत आहे. टुरिझम इंडस्ट्रीने ‘व्हॅक्सिन टुरिझम’ हा नवा प्रयोग शोधून काढला आहे. या प्रयोगाचे नाव ऐकताच ‘व्हॅक्सिन टुरिझम’ नेमक आहे तरी काय? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. हा नवीन प्रयोग असला तरी याची पद्धत ही जुनीच आहे.
नेमक काय आहे ‘व्हॅक्सिन टुरिझम’
व्हॅक्सिन टुरिझम म्हणजे ज्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध असेल अशा ठिकाणी जाणून पर्यटकांना मस्त फिरता येईल, नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येईल आणि कोरोना लसीच टोस घेऊन परत येऊ शकता. याचा फायदा असा की, फिरणं पण होईल आणि कोरोना प्रतिबंधक लस ही मिळेल. मात्र, ही ऑफर सर्वांनाच परवडेल असं नाही कारण हे पॅकेज उच्च उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन तयार केलेली आहेत.
मुंबईत स्थित असणारी ‘जेम टूर अॅन्ड ट्रॅव्हल कंपनी’ कोरोना काळात व्हॅक्सिन टुरिझम हा नवा पॅकेज घेऊन आली आहे. सध्या ही कंपनी अमेरिकेच्या दौऱ्याची ऑफर देत आहे. अमेरिकेत डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे. कंपनीने या पॅकेजची किंमत १ लाख ७५ हजार रूपये ठरविली आहे. टुरिझम इंडस्ट्रीचा हा पहिला प्रयोग नाही तर याआधी डिजास्टर टुरिझम हा नवा प्रयोग केला होता.