मुक्तपीठ टीम
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भारतात उसळण्यापासून रोखण्याचा मार्ग दाखवला. ते म्हणाले, जर लोक सावधगिरी बाळगून काळजी घेतील, भारतात प्राधान्यानं मोठ्या संख्येने लसीकरण झाले तर कोरोनाची तिसरी लाट रोखता येऊ शकते. तिसरी लाट आलीच तर ती सौम्य असू शकते.
तिसरी लाट रोखायची कशी?
- लोकांनी कोरोना नियमांचे पालन करावे.
- जास्तीत जास्त सावधगिरी बाळगली जावी.
- देशात जास्तीत जास्त लसीकरण प्राधान्याने केले जावे.
लसींचं मिश्रण
• लसींचे मिश्रण करण्याबाबत अधिक डेटा आवश्यक आहे. याबद्दल अभ्यास केला गेला आहे. पण ते प्रभावी ठरू शकतात, परंतु नेहमीपेक्षा जास्त दुष्परिणाम देखील होऊ शकतात.
• त्यामुळेच नेमकं समजण्यासाठी आम्हाला अधिक डेटा हवा आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या
• सक्रिय रुग्णसंख्या कमी होत आहे, परंतु देशात असे काही विभाग आहेत, जेथे पॉझिटिव्हीटी अधिक आहे.
• या भागात आणखी वाढ होऊ नये म्हणून आक्रमक दृष्टिकोन अवलंबण्याची गरज आहे.