Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशाचा अर्थसंकल्प २०२२-२०२३: सर्वसामान्य करदात्यांची निराशाच! आयकराच्याबाबतीत दिलासा नाहीच!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
income tax (2)

मुक्तपीठ टीम

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा २०२२-२०२३चा अर्थसंकल्प सादर केला आहे. खरंतर अर्थसंकल्प म्हटलं तर सामान्यांना फक्त प्रत्यक्ष कर म्हणजेच आयकराएवढाच अर्थपूर्ण वाटतो. मात्र, या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा मिळेल अशा अपेक्षेचा भंग झाला आहे. कररचनेत कोणताही बदल न केल्याने सर्वसामान्यांच्या वाटेला निराशा आली आहे. म्हणजेच सध्या जी आयकर रचना आहे, त्यानुसार यापुढेही कर भरावा लागणार आहे. चांगलं एकच आहे, कर व्यवहार प्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. या अंतर्गत आता तुम्हाला तुमचे दोन वर्षेांपर्यंत जुने इन्कम टॅक्स रिटर्न अपडेट करता येतील.

 

आयकर रचना आहे तशीच!

  • २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर अद्याप कर
  • यावेळी कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
  • केवळ २.५ लाख वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर नाही.
  • २.५ ते ५ लाखांवर ५% कर भरावा लागेल.
  • ५ ते ७.५ लाखांपर्यंत १० टक्के आणि ७.५ ते १० लाखापर्यंत १५ टक्के आयकर बरावा लागेल.
  • याशिवाय १० लाख ते १२.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २२०, १२.५ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के आणि १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३० टक्के दराने कर भारावा लागेल.

 

आयकर रिटर्न भरण्यासाठी पर्याय!

  • आयकर रिटर्न भरण्यासाठी २ पर्याय आहेत, नवीन पर्याय १ एप्रिल २०२० रोजी देण्यात आला.
  • नवीन कर स्लॅबमध्ये, ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावरील कर दर कमी ठेवण्यात आला होता, परंतु डिडक्शन काढून घेण्यात आली.
  • दुसरीकडे, तुम्ही जुना आयकर स्लॅब निवडल्यास, तुम्ही विविध कर कपातीचा लाभ घेऊ शकता.

 

गेल्या १० वर्षात आयकर स्लॅबमध्ये कोणकोणते बदल?

  • गेल्या काही वर्षांत कर स्लॅबमध्ये अनेक वेळा बदल करण्यात आले आहेत.
  • ३१ मार्च २०१० पूर्वी केवळ १.६० लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त होते.
  • जे २०११ मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात १.८० लाख रुपये करण्यात आले होते.
  • त्यानंतर वेळोवेळी बदल करण्यात आले.

 

७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना रिटर्न आवश्यक नाही!

  • ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना टॅक्स रिटर्न भरण्यापासून सूट देण्यात आली होती.
  • केवळ पेन्शन किंवा बँकेच्या व्याज उत्पन्नावर अवलंबून असलेल्या ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ITR दाखल करण्याची गरज नाही.
  • जर ते इतर स्त्रोतांकडूनही उत्पन्न मिळवत असतील, मग ते भाडे असो किंवा इतर काही, तर त्यांना नेहमीप्रमाणे ITR भरणे आवश्यक असेल.

 

२.५ लाखांवरील ULIP प्रीमियमवर कर भरावा लागेल

  • युनिट-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (ULIPs) च्या प्रीमियम्सवर कलम १०(१०ड) अंतर्गत उपलब्ध कर सूट मर्यादित करण्यात आली आहे.
  • यानंतर, प्रीमियम २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, कर सूट नाही.

Tags: Budget 2022NIRMALA SITARAMANTax Retrunअर्थमंत्री निर्मला सीतारामणअर्थसंकल्पआयकरटॅक्स रिटर्न
Previous Post

एनसीसी संचालनालयाच्या कठोर परिश्रमामुळे ‘प्रधानमंत्री ध्वज’ – सुनील केदार

Next Post

महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत ३ टक्के निधी कायमस्वरूपी

Next Post
yashomati Thakur

महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत ३ टक्के निधी कायमस्वरूपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!