मुक्तपीठ टीम
नोव्हेंबर २०२२ मध्ये देशातील वाहनांच्या किरकोळ विक्रीत मोठी वाढ झाली. तर, प्रवासी वाहने, दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीत विशेष वाढ झाली आहे. फेडरेशन ऑफ व्हेईकल डीलर असोसिएशनने याबाबत ही माहिती दिली. नोव्हेंबर महिन्यात ऑटो सेक्टरमध्ये मागणी वाढली होती, त्यामुळे किरकोळ विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
एफएडीएचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “नोव्हेंबर २०२२ हा भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाच्या इतिहासातील सर्वाधिक किरकोळ विक्रीचा महिना ठरला आहे.” वाहनांची एकूण किरकोळ विक्री नोव्हेंबर २०२२मध्ये २३ लाख ८० हजार ४६५ युनिट्स झाली. नोव्हेंबर २०२१ च्या तुलनेत हे २६ टक्के अधिक आहे.
वाहनांच्या विक्रमी विक्रीची मुख्य कारणे…
- दिवाळींतर लग्नाचा सिझन सुरू झाल्यामुळे विक्रीत वाढ झाली.
- उत्तम मॉडेल्सची उपलब्धता
- बाजारात नवीन वाहनांची जबरदस्त फिचर्ससह एन्ट्री
- ग्रामीण भागातून वाढती मागणी
यावर्षी २०२२च्या तुलनेत २०२१मधील वाहनांची विक्री
प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री नोव्हेंबर २०२१मध्ये २ लाख ४८ हजार ५२ युनिट्सवरून २१% वाढून ३ लाख ९२२ युनिट झाली. २०२२ मध्ये दुचाकी विक्री २४% वाढून १८ लाख ४७ हजार ७०८ युनिट्सवर पोहोचली आहे. दुचाकी विक्री नोव्हेंबर २०२१ मध्ये १४ लाख ९४ हजार ७९७ युनिट्स होती. तीनचाकी आणि ट्रॅक्टरच्या विक्रीत अनुक्रमे ८१% आणि ५७% वाढ झाली आहे.