Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

June 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ajit Pawar

मुक्तपीठ टीम

राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात १ जुलै २०२१ पासून वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे वसतीगृह अधीक्षकांचे मानधन दहा हजार रुपये, स्वयंपाकींचे मानधन आठ हजारस रुपये, मदतनीस आणि चौकीदारांचे मानधन प्रत्येकी साडेसात हजार रुपये होणार आहे. राज्यातील २ हजार ३८८ अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या ८ हजार १०४ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुदानित वसतीगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या प्रश्नासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यात सुरु असणाऱ्या २ हजार ३८८ अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या अधिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि चौकीदार अशा एकूण ८ हजार १०४ कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यभरातील अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या २ हजार ३८८ अधीक्षकांचे मानधन दहा हजार रुपये, २ हजार ८५८ स्वयंपाकींचे मानधन आठ हजार रुपये, तर ४७० मदतनीसांचे आणि २ हजार ३८८ चौकीदारांचे मानधन प्रत्येकी साडेसात हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी १ जुलै २०२१ पासून करण्यात येणार आहे. या निर्णयाबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

 


Tags: Deputy Chief Minister Ajit Pawarउपमुख्यमंत्री अजित पवारधनंजय मुंडेराज्यमंत्री विश्वजीत कदम
Previous Post

रामभाऊ खांडेकर यांच्या निधनाने एक निस्पृह व्यक्तिमत्त्व हरपले!

Next Post

“१० ते १२ जून या कालावधीत ठाणे जिल्हयात अतिवृष्टी होण्याची शक्यता”

Next Post
Thane

"१० ते १२ जून या कालावधीत ठाणे जिल्हयात अतिवृष्टी होण्याची शक्यता"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!