मुक्तपीठ टीम
युटीएसऑनमोबाईल (UTSONMOBILE) अॅपद्वारे अनारक्षित तिकिटे बुक करण्यासाठीच्या अंतराची सुविधा उपनगरी नसलेल्या भागांसाठी २० किमी अंतरापर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. तर उपनगरीय भागासाठीचे अंतर वाढवून ५ किमीपर्यंत करण्यात आले आहे.
यापूर्वी, अनारक्षित तिकीट बुकिंग प्रणाली युटीएसऑनमोबाईल अॅपच्या माध्यमातून उपनगरीय नसलेल्या विभागातील प्रवाशांना ५ किमी अंतरापर्यंत तिकीट बुक करता येत होते. तर उपनगरीय विभागासाठी, युटीएसऑनमोबाईलद्वारे तिकीट बुक करण्यासाठी अंतर मर्यादा २ किमी होती.
अधिक तपशीलांसाठी या संकेतस्थळाला भेट द्या : “https://www.utsonmobile.indianrail.gov.in”