मुक्तपीठ टीम
आयकर विभागाने नुकतचं हैदराबाद स्थित हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुप (हेटेरो फार्मा) वर छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान हेटेरो फार्मास्टुटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका कपाटात तब्बल १४२ कोटी रुपये सापडले आहेत. या फार्मा कंपनीची उलाढाल जवळपास ७५०० कोटी रुपये इतकी आहे. या कंपनीने कोरोना व्हॅक्सिन स्पुतनिक व्हीच्या निर्मितीसाठी रशियासोबत करार केला होता. मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम मिळताच प्राप्तिकर विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले.
एका कपाटात १४२ कोटीची रोकड!
- अहवालानुसार, या छाप्यात ५५० कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न सापडले.
- आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ १४२ कोटी रुपयांची रोकड सापडली.
- कपाटात भरलेल्या पैशाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
- अलीकडेच, हेटेरो फार्मास्युटिकल ग्रुपवरील आयकर विभागाने ६ राज्यांमधील सुमारे ५० ठिकाणी सर्च ऑपरेशन (हेटेरो फार्मा आयटी रेड) केले आहे.
कंपनीचा उद्योग कोणता?
- सीबीडीटीने म्हटले आहे की हेटरो ग्रुप हा औषध निर्मिती, उत्पादन आणि विक्री उद्योगात आहे.
- त्याची बहुतेक उत्पादने अमेरिका आणि दुबईसारख्या देशांमध्ये आणि काही आफ्रिकन आणि युरोपियन देशांमध्ये निर्यात केली जातात.
- हेटेरो समूह कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात आलेल्या रेमडेसिविर आणि फेविपीरावीरसारख्या विविध औषधांच्या निर्मितीच्या निमित्ताने प्रकाशझोतात आला होता.
- भारत, चीन, रशिया, इजिप्त, मेक्सिको आणि इराणमध्ये २५ हून अधिक ठिकाणी उत्पादन सुविधा आहेत.