मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मंदिर संस्थानाचं उत्पन्न वाढलं आहे ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ या काळात देवस्थानाला जवळ जवळ वर्षाएवढं उत्पन्न मिळालं आहे. मनी ऑर्डर शुल्क दर्शनाच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली आहे. देवी दर्शनासाठी मंदिर संस्थानाकडून २०० रुपये ५०० रुपये असे शुल्क आकारले जाते.
आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधून भाविक मोठया प्रमाणात भाविक येतात.भक्तांना देवी दर्शन लवकर व्हावे म्हणून मंदिर संस्थानकडुन सशुल्क दर्शन दिले जाते. या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आता चैत्र पौर्णिमा असल्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक देवी दर्शनासाठी येत आहेत.
मंदिर संस्थानला गेल्या ६ महिन्यात २० कोटी ४४ लाख उत्पन्न मिळालं आहे. कोरोना संकटात मंदिरही बंद ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आता शिथिल झाल्यानंतर भक्तांचा दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात ओघ सुरु झाला आहे. त्यांनी दिलेल्या देणगी, सशुल्क दर्शन यामुळे मंदिराच्या उत्पन्नात भरीव वाढ दिसत आहे. यात भक्तांनी अर्पण केलेले सोने चांदी व रोख देणगी याचा समावेश आहे.
सहा महिन्यांमध्ये जवळपास वर्षाचं उत्पन्न!
- ऑक्टोबर २०२१ ३ कोटी ७४ लाख
- नोव्हेंबर २०२१ ३ कोटी ८२ लाख
- डिसेंबर २०२१ ४ कोटी १० लाख
- जानेवारी २०२२ २ कोटी ४० लाख
- फेब्रुवारी २०२२ ३ कोटी ९० लाख
- मार्च २०२२ २ कोटी ४८ लाख
- सहा महिन्यांचं उत्पन्न २० कोटी ४४ लाख (याशिवाय इतरही)
चार वर्षातील आई तुळजाभवानी देवस्थानाचे उत्पन्न
- २०१८ – २०१९ २८.९१ कोटी
- २०१९ – २०२० २६.१५ कोटी
- २०२०-२०२१ ०९.९९ कोटी
- २०२१-२२ २० कोटी ४४ लाख (फक्त ६ महिन्यांमध्ये) (याशिवाय इतरही मिळवून २९ कोटी)