Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पहिल्या ‘मेड इन इंडिया’ चालकरहित मेट्रोचे उद्घाटन, मुंबईत धावणार!

January 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
rajnath singh

मुक्तपीठ टीम

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बीईएमएल अर्थात भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या बेंगळूरू कॉप्लेक्स इथे झालेल्या कार्यक्रमात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मेट्रो प्रकल्पासाठी चालक रहित मेट्रो गाडीचे उद्घाटन केले. स्वदेशात डिझाईन आणि विकसित केलेल्या चालक विरहीत मेट्रो रेल्वेचे बीईएमएलच्या बेंगळूरू कॉप्लेक्स इथे निर्मिती करण्यात येत आहे.

 

एमएमआरडीए प्रकल्पात ६३ टक्के स्वदेशी सामग्री असून येत्या दोन-तीन वर्षात हे प्रमाण ७५ टक्यापर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला भारतीय उद्योग क्षेत्राच्या मिळालेल्या अभूतपूर्व  प्रतिसादाची प्रचीती  यातून  येत असल्याचे ते म्हणाले.

 

चालक रहित मेट्रो प्रकल्प म्हणजे इतर भारतीय कंपन्यांना विशेषकरून संरक्षण उद्योगाशी संबंधित  उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे ५ अब्ज अमेरिकी डॉलर्स संरक्षण निर्यात उद्दिष्ट आणि २०२५ पर्यंत संरक्षण उद्योग क्षेत्राची उलाढाल २५ अब्ज अमेरिकी डॉलर्स करण्याचे  उद्दिष्ट साध्य होण्यासाठी मदत होणार असल्याचे ते म्हणाले. चालक रहित तंत्रज्ञानाचा रणगाडे, लढाऊ विमाने यासारख्या क्षेत्रात भविष्यात विस्तार होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

मेट्रो निर्मितीमधले बीईएमएलचे पाऊल म्हणजे देशाच्या नागरी वाहतूक क्षेत्रातला निर्णायक क्षण असल्याची भावना बीईएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक कुमार होटा यांनी व्यक्त केली.

 

 

 


Tags: BEMLBEML of Metro RailwayDefense Minister Rajnath Singhdriverless metroFirst Made in Indiamade in indiaबीईएमएलसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह
Previous Post

“महाबळेश्वरचा कायापालट घडवा…पण विकास पर्यावरणपूरकच!”

Next Post

लसीनंतर आता काय होणार कोरोनाचे?

Next Post
corona vaccine

लसीनंतर आता काय होणार कोरोनाचे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!