Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापूर – मुंबई विमानसेवेचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

October 6, 2022
in सरकारी बातम्या
0
Direct Flights between Kolhapur – Mumbai Inaugurated by MoCA Minister 2

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत आज नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे कोल्हापूर – मुंबई या विमानसेवेचे उद्घाटन केले.

येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या राजीव गांधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया  यांच्या  हस्ते  विभागाचे राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह, अपर सचिव उषा पाधी  यांच्या उपस्थितीत कोल्हापूर – मुंबई  विमानसेवेचे  दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन झाले. पुढील वर्षी मार्च महिन्यात कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे (डोमेस्टिक टर्मिनल) उद्घाटन करण्यात येईल, असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास कोल्हापूर विमानतळाहून खासदार सर्वश्री संजय मंडलिक, धैर्यशील माने, धनंजय महाडिक तसेच पंढरपूर येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान योजनेंतर्गंत देशातील २ टियर आणि ३ टियर शहरांना विमानसेवेने जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर आणि मुंबई शहरांमध्ये ही विमानसेवा सुरु झाली आहे. या शहरांदरम्यान स्टार एअरच्यावतीने आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवसांमध्ये ही  विमानसेवा असेल.

मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे उद्घाटन

ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, देशातील जनतेला रास्तदरात विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘उडान योजना’ सुरु केली आहे. आतापर्यंत देशातील ४३३ मार्गांवर ही सेवा सुरु झाली असून १ कोटींहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले. मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमातळाच्या देशांतर्गत टर्मीनलचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावेळी सांगितले.


Tags: jyotiraditya shindeKolhapur AirportKolhapur mumbaiKolhapur Mumbai Airwaysकोल्हापूर - मुंबई विमानसेवा
Previous Post

गर्दी जमली, भाषणं झाली…पण यशस्वी मेळावा कुणाचा?

Next Post

प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त – जिल्हाधिकारी राजीव निवतकर

Next Post
Rahul Narvekar

प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त - जिल्हाधिकारी राजीव निवतकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!