Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गाव तसं छोटं, पण कार्य मोठं! विधवांचा हळदीकुंकू, पुस्तकांचं वाण!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
haldikunku

मुक्तपीठ टीम

सोलापूर जिल्ह्यातील अकलुज तालुक्यातील माळेवाडी हे तसे छोटे गाव. पण महाराष्ट्रभरातील कोणत्याही गावाप्रमाणे तिथं महिलांचे सांस्कृतिक सोहळे उत्साहात साजरे केले जातात. त्यानुसारच मकरसंक्रातीपासून हळदीकुंकू कार्यक्रमांचे आयोजन सुरु होते. पण माळेवाडीतील भगिनींनी हा कार्यक्रम असा आयोजित केला की अवघ्या राज्यासमोर छोट्या गावानं मोठा आदर्श ठेवला. त्यांनी विधवा महिलांना आपल्या हळदीकुंकूत सहभागी केले आणि वाण म्हणून सर्वांना वाटली ती पुस्तके!

 

नेहमी ‘वाण’ द्यायचा विचार करतांना आपण विधवांना विसरतो, पण माळेवाडीमधील संजयनगरमधील महिलांनी वेगळीच संकल्पना राबवली. विधवांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सन्मानानं सहभागी केलं. या हळदीकुंकूत राजमाता जिजाबाई, कांतीजोती सावित्रीबी फुले यांच्यावरील पुस्तके वाण म्हणून दिली. याचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा सौ सीमाताई एकतपुरे यांनी समता परिषदेच्या माध्यमातून केले.

 

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये सवाष्ण महिलांचा सहभाग दिसतो. यातून परितक्त्या,एकल महिला बाहेर राहतात. याला फाटा देत माळशिरस तालुक्यातील माळेवाडी संजयनगरमध्ये राहणाऱ्या विधवा महिलांना एकत्रित करून सीमाताई एकतपुरे यांनी तिळगुळ व वान म्हणून सावित्रीबाई फुले चरित्र पुस्तक भेट दिले. pic.twitter.com/0H9s5kZqcc

— Prof. Hari Narke (@harinarke) January 16, 2022

हळदी- कुंकू कार्यक्रम हे महिलांसाठी खास आकर्षणाचा विषय

  • या कार्यक्रमांपासून विधवा महिलांना काही कारण नसताना दूर ठेवले जाते.
  • माळेवाडीच्या महिलांनी ती प्रथा मोडली. त्यांनी गावातील पतीचे निधन झालेल्या महिलांनाही सहभागी केले.
  • हळदी-कुंकू करायचे म्हटले की, सगळ्यात आधी विचार होतो तो, यंदा संक्रांतीमध्ये काय वाण द्यायचं?
  • वाणाची वस्तू कशी युनिक आणि हटके असावी याशिवाय सगळ्यांना तिचा फायदा व्हावा, अशी प्रत्येकीची अपेक्षा असते.
  • त्यानुसार विचार करून पुस्तके हेच वाण म्हणून देण्याचे नक्की करण्यात आले.
  • ज्ञानज्योती सावित्रीमाई यांचे हरी नरके सर यांनी लिहिलेले चरित्र आणि राजमाता जिजाऊंवरील दुसरे एक पुस्तक अशा पुस्तकांचा वाणात समावेश करण्यात आला.

 

राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष जयाताई एकतपुरे यांच्या नेतृत्वाखालील कार्यक्रमास थोरात ताई, सुरेखा एकतपुरे, भाग्यश्री एकतपुरे यावेळी विधवा महिला सगुणा साठे, राष्ट्रवादी महिला कार्यकारी सदस्य जनाबाई काळे ताई, शालन गायकवाड ताई, सुमन दुधभाते ताई, जयश्री ऐवळे ताई इत्यादी महिला उपस्थित होत्या. सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर मनमुराद आनंद फुलला होता.
सदर उपक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगनराव भुजबळ, राज्य महिला आयोग अध्यक्षा, प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर आणि अनिल नळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

पाहा व्हिडीओ:


Tags: Akluj Talukadyanjyoti Savitrimaigood newshari narkeMalewadi VillagemuktpeethNationalist Women's Working President Jayatai EkatpureSolapur Districtvillagewidowsअकलुज तालुकागावचांगल्या बातम्याज्ञानज्योती सावित्रीमाईपुस्तकांचं वाणमाळेवाडी गावमुक्तपीठराष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष जयाताई एकतपुरेविधवांचे हळदीकुंकूसोलापूर जिल्हाहरी नरके
Previous Post

राज्यात ३९ हजार २०७ नवे रुग्ण, तर ३८ हजार ८२४ बरे! वाचा कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या महानगरात किती…

Next Post

पुण्याच्या स्टार्टअप्सचा पुरस्कारांमध्ये झेंडा, सेनादलांसाठीच्या ‘उड चलो’चाही गौरव!

Next Post
Ud Chalo

पुण्याच्या स्टार्टअप्सचा पुरस्कारांमध्ये झेंडा, सेनादलांसाठीच्या ‘उड चलो’चाही गौरव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!