Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्र तर राज्यात सातारा जिल्ह्याची मुसंडी

June 29, 2022
in चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
PGI 2019-20

मुक्तपीठ टीम

केंद्र शासनाच्या ‘जिल्ह्यांच्या श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकात’ महाराष्ट्राने एका  श्रेणीच्या वाढीसह उत्तम कामगिरी केली आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये शेवटच्या क्रमांकाहून थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेत सातारा जिल्ह्याने या निर्देशाकांत ‘अती उत्तम श्रेणी’  गाठली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय आणि साक्षरता विभागाने सोमवारी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ आणि २०१९-२० साठीचा श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला. अशा प्रकारचा हा पहिलाच अहवाल असून याद्वारे शालेय शिक्षणाच्या प्रगतीचा राज्यांतर्गत तुलनात्मक आलेख मांडण्यात आला आहे.

केंद्राच्या शालेय आणि साक्षरता विभागाने राज्यांसाठी ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ (PGI) तयार केला आणि संदर्भ वर्ष २०१७-१८ ते २०१९-२० हे धरून अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील वर्ष २०१८-१९ साठी ७२५ जिल्ह्यांची तर वर्ष २०१९-२०साठी ७३३ जिल्ह्यांची गुणात्मक क्रमवारी प्रकाशित करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावला

देशातील सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधून प्राप्त माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या राज्यांच्या ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’मध्ये महाराष्ट्राने वर्ष २०१८-१९ मधील ‘श्रेणी १’ वरून वर्ष २०१९-२० मध्ये ‘श्रेणी १+’ अशी प्रगती केली आहे. या अहवालांतर्गत देशातील राज्यांना प्रगतीच्या आधारे एकूण १००० गुणांकानुसार एकूण १० श्रेणीत  विभागण्‍यात आले आहे. वर्ष २०१८-१९ मध्ये महाराष्ट्राने ८०१ ते ८५० गुणांच्या ‘श्रेणी १’ मध्ये स्थान मिळविलेल्या दोन राज्यांत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर  वर्ष २०१९-२० मध्ये राज्याने या अहवालात ८६९ गुण मिळवून ‘श्रेणी १+’ मध्ये स्थान मिळविले आहे. याच श्रेणीत देशातील एकूण ७ राज्यांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

‘जिल्हास्तरीय श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांका’त महाराष्ट्रातील जिल्ह्यांतर्गत सातारा जिल्ह्याने उत्तम कामगिरी करत वर्ष २०१८-१९ मधील शेवटच्या स्थानाहून (प्रचेष्टा-३) वर्ष २०१९-२० थेट ‘अती उत्तम श्रेणीत’ स्थान मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.

जिल्हास्तरीय श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकाच्या–(PGI-D) रचनेत, ‘परिणाम, वर्गांमधील व्यवहारांचा प्रभाव, शाळेतील  पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण, डिजिटल शिक्षण आणि नियमन प्रक्रिया’अशा ६ श्रेणींमध्ये एकूण ८३ निर्देशकांआधारे ६०० गुण देण्यात आले आहेत. एकूण प्राप्त गुणांची प्रतवारी ९ श्रेणीत केली असून यात ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त जिल्ह्याची प्रतवारी ‘दक्ष’ श्रेणीत केली आहे. ८१ ते ९० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘उत्कर्ष’, ७१ ते ८० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘अतीउत्तम’,  ६१ ते ७० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘उत्तम’, ५१ ते ६० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘प्रचेष्टा १’, ४१ ते ५० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘प्रचेष्टा २’ आणि ३१ ते ४० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना  ‘प्रचेष्टा ३’ अशा श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. 

वर्ष २०१९-२०मध्ये राज्यातील २५ जिल्हे ‘उत्तम श्रेणी’त

वर्ष २०१९-२० मध्ये ‘अती उत्तम श्रेणी’त देशातील २० जिल्ह्यांनी स्थान मिळविले तर महाराष्ट्रातून सातारा या एकमेव जिल्ह्याने ४२३ गुणांसह या श्रेणीत स्थान मिळवून राज्यात प्रथम स्थान पटकाविले आहे. याच वर्षी उत्तम श्रेणीत राज्यातील २५ जिल्ह्यांनी स्थान मिळविले आहे, या श्रेणीत देशातील ९५ जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांचा समावेश ‘प्रचेष्टा १’ तर एका जिल्ह्याचा समावेश प्रचेष्टा २ मध्ये आहे.

वर्ष २०१८-१९ मध्ये ‘उत्तम श्रेणी’त देशातील ८९ जिल्ह्यांनी  स्थान मिळविले तर महाराष्ट्रातून १२ जिल्ह्यांनी  या  श्रेणीत स्थान मिळविले आहे. याच वर्षी ‘प्रचेष्टा १’ श्रेणीत राज्यातील १५ जिल्ह्यांनी स्थान मिळविले आहे तर ४ जिल्ह्यांचा समावेश ‘प्रचेष्टा २’ आणि ५ जिल्ह्यांचा समावेश प्रचेष्टा ३ मध्ये करण्यात आला आहे.


Tags: educationMaharashtrasataraजिल्ह्यांच्या श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकमहाराष्ट्रशालेय शिक्षणसातारा
Previous Post

पोलीस शिपाई भरतीत पहिल्यांदा शारीरिक चाचणी

Next Post

राज्यात ३९५७ नवे रुग्ण, ३६९६ रुग्ण बरे! मुंबई १५०४, नाशिक ६, नागपूर २२ नवे रुग्ण !!

Next Post
राज्यात २९५६ नवे रुग्ण, २१६५ रुग्ण बरे! मुंबई १७२४, नाशिक २, नागपूर ५ नवे रुग्ण !!

राज्यात ३९५७ नवे रुग्ण, ३६९६ रुग्ण बरे! मुंबई १५०४, नाशिक ६, नागपूर २२ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!