मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजी उत्तर प्रदेशाला भेट देऊन सुलतानपूर जिल्ह्यातील करवाल खेरी येथे पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तरप्रदेशात मोठ्या धडाकेबाज विकासकार्यांच्या उद्घाटनांची सुरुवात भाजपाने केली आहे. त्याचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले.
उद्घाटन समारंभ झाल्यानंतर पंतप्रधानांनी सुलतानपूर जिल्ह्यात द्रुतगती मार्गावर बांधण्यात आलेल्या धावपट्टीचा वापर करून होणाऱ्या हवाई कसरती पाहिल्या. आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे उड्डाण आणि उतरणे शक्य व्हावे यासाठी ही 3.2 किलोमीटर लांबीची धावपट्टी बांधण्यात आली आहे.
असा आहे मोदींचं विमान उतरलेला एक्स्प्रेस वे…
पूर्वांचल द्रुतगती महामार्गाची लांबी 341 किलोमीटर असून तो लखनौ जिल्ह्यात लखनौ-सुलतानपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.731 वरील चौदसराय गावापासून सुरु होतो आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.31 वर उत्तर प्रदेश-बिहार सीमेच्या पूर्वेला 18 किलोमीटरवर असलेल्या हैदरीया गावापर्यंत जातो.
हा द्रुतगती महामार्ग 6 पदरी असून भविष्यात त्याचे 8 पदरीकरण करता येईल.
सुमारे 22,500 कोटी अंदाजित खर्च करून निर्माण करण्यात आलेला हा पूर्वांचल द्रुतगती महामार्ग उत्तर प्रदेश राज्याच्या पूर्व भागाचा विशेषतः लखनौ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकर नगर, आझमगढ, महू आणि गाझीपुर या जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देईल.
पाहा व्हिडीओ: https://youtu.be/GPM35VknE7s