मुक्तपीठ टीम
मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य असेल जिथे वैद्यकीय अभ्यास हिंदी भाषेत करण्यात येत आहे. एनॉटामी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री या विषयांवर हिंदीत पुस्तके तयार करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.
भाजपा सरकारने इतिहास रचला- अमित शाह
- यावेळी अमित शाह म्हणाले की, ‘आजचा दिवस भारताच्या शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
- इतिहासात आजच्या दिवसाची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल.
- नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण, तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणात मातृभाषेला महत्त्व देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
- देशात सर्वप्रथम हिंदीतून वैद्यकीय शिक्षण सुरू करून शिवराज सिंह यांच्या सरकारने पंतप्रधानांची इच्छा पूर्ण केली आहे.
- आजचा दिवस मातृभाषेचे समर्थक असलेल्यांसाठी अभिमानाचा आहे.
- तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणात हिंदी अभ्यासक्रम सुरू करून भाजपा सरकारने इतिहास रचला आहे.
इतर शिक्षणही मातृभाषेत होणार, अमित शाहांचा निर्धार
- अमित शहा पुढे म्हणतात की, हा क्षण देशातील शिक्षण क्षेत्राच्या पुनर्रचनेचा क्षण आहे.
- वैद्यकीय अभियांत्रिकीमध्ये मातृभाषेचे समर्थन करणाऱ्यांसाठी आजचा दिवस मोठा आहे.
- आता आम्हाला आमच्याच भाषेत शिक्षण मिळेल.
- भाषेमुळे एकही मुलगा वंचित राहणार नाही.
- सरकारच्या या प्रयत्नाने हे पाऊल अशक्य म्हणणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिले आहे.
- कोणत्याही व्यक्तीची विचार करण्याची प्रक्रिया त्याच्या मातृभाषेतूनच घडते.
- नेल्सन मंडेला म्हणाले की, एखाद्या व्यक्तीशी त्याच्या मातृभाषेत बोलले तर ती गोष्ट त्याच्या हृदयापर्यंत पोहोचते.
- जगभरातील शिक्षणतज्ञांनी मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व दिले आहे.
- भारतातही वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि कायद्याचे शिक्षण हिंदीसह देशातील विविध राज्यांतील मातृभाषेतून होईल.
हा उपक्रम सामाजिक क्रांती ठरणार?
- देवनागरी लिपीतील सोप्या आणि प्रचलित इंग्रजी शब्दांचा जास्तीत जास्त वापर केल्याने विद्यार्थ्यांना वैद्यकीय व तंत्रशिक्षणाचा अभ्यास करणे सोपे जाईल, असे मुख्यमंत्री शिवराज म्हणाले.
- यासोबतच शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हिंदी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळणार असून, मध्य प्रदेशचा हा उपक्रम सामाजिक क्रांती ठरणार आहे.
- हिंदीतील व्यावसायिक शिक्षणाची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
- वैद्यकीय, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, नर्सिंग आणि पॅरामेडिकल शिक्षणही हिंदीतून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
एमबीबीएस प्रथम वर्षाची पुस्तके हिंदी भाषेत तयार!
- मुख्यमंत्री शिवराज म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास कैलाश सारंग यांच्या नेतृत्वाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ९७ डॉक्टरांच्या टीमने ४ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर एमबीबीएस प्रथम वर्षाच्या एनॉटामी, फिजियोलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीची पुस्तके तयार केली आहेत.
- सध्या द्वितीय वर्षाची पुस्तके तयार केली जात आहेत. पीजी वर्गांसाठी टप्प्याटप्प्याने हिंदीतील पुस्तकेही तयार केली जातील.