Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दारू घोटाळ्यात सीबीआयनंतर आता ईडीची कारवाई, भारतात अनेक राज्यांमध्ये छापेमारी!

September 6, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
cbi-ed

मुक्तपीठ टीम

दिल्ली सरकारच्या दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनंतर आता ईडीही दाखल झाली आहे. दिल्ली सरकारच्या दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली-एनसीआरसह देशातील ६ राज्यांमध्ये ३०हून अधिक ठिकाणी छापे टाकले. ईडीचे अधिकारी दिल्ली, गुरुग्राम, लखनऊ, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादसह अनेक शहरांतील दारू व्यापाऱ्यांच्या ठिकाणी पोहोचले आहेत. दिल्ली सरकारने यापूर्वी आणलेल्या अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याच्या चौकशीत केंद्रीय एजन्सी गुंतल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, तेलंगणामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांची शोधमोहीम सुरू आहे.

विशेष म्हणजे दिल्ली सरकारच्या नव्या अबकारी धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. या संदर्भात सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या घराची आणि बँक लॉकरची झडती घेतली आहे. आता याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. ईडीने सीबीआयकडून या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मागवली होती.

प्रकरण नेमकं काय आहे?

  • अबकारी धोरणातील घोटाळ्याबाबत केंद्रीय अन्वेषण यंत्रणा म्हणजेच सीबीआयने १७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला होता.
  • ३० हून अधिक ठिकाणी शोधमोहीम राबवल्यानंतर सीबीआयने उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री मनीष सिसोदिया यांना एफआयआरमध्ये पहिले आणि मुख्य आरोपी बनवले होते.
  • या प्रकरणात अनेक अज्ञात आरोपी, कंपन्यांसह एकूण १६ जणांना आरोपी करण्यात आले होते.
  • सीबीआयने नोंदवलेल्या याच प्रकरणाचा ताबा घेत ईडी मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत त्याची चौकशी करत आहे.

राज्यात ३० ठिकाणी छापेमारी सुरू!

  • अबकारी धोरणांतर्गत कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात सहा राज्यांमध्ये ३० ठिकाणी शोधमोहीम सुरू असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात नाव असलेल्या लोकांवर हा छापा टाकण्यात येत आहे.
  • ईडीने सीबीआय एफआयआरची दखल घेतल्यानंतर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी कलमांतर्गत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, ज्यामध्ये सिसोदिया आणि इतर १४ जणांची नावे आहेत.
  • गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित अनियमितता झाली होती का, याची ईडी चौकशी करत आहे.

Tags: CBI ActionED ActionLiquor ScammuktpeethRaids in Indiaईडी कारवाईघडलं-बिघडलंदारू घोटाळाभारतात छापेमारीमुक्तपीठसीबीआय कारवाई
Previous Post

दक्षिणेतील राज्यांमध्ये पावसामुळे हाहा:कार! आयटी सिटी बंगळुरू पाण्यात, आयटी प्रोफेशनल तरुणीचा शॉकने मृत्यू!!

Next Post

सायरस मिस्त्री अपघात : अनेक प्रश्न…पोलीस थेट जर्मनीतील कार कंपनीलाही विचारणार, डेटा रेकॉर्डर चिप उत्तरं देणार!

Next Post
Cyrus Mistry Accident

सायरस मिस्त्री अपघात : अनेक प्रश्न...पोलीस थेट जर्मनीतील कार कंपनीलाही विचारणार, डेटा रेकॉर्डर चिप उत्तरं देणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!