Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गावात थंडीत नसतो सूर्यप्रकाश, पठ्ठ्यानं पृथ्वीवरच बनवला गावापुरता सूर्य!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Viganella

मुक्तपीठ टीम

सूर्याशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करता येत नाही. मुळात सूर्य नसता तर काहीच नसतं. पाण्याप्रमाणेच प्रकाश हेही मनुष्यासाठी जीवनावश्यक आहे. मानवी शरीर, निसर्ग, प्राणी, पक्षी या सर्वांनाच सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे. असं असलं तरीही पृथ्वीवरील काही ठिकाणे अशी आहेत की जिथे सूर्याचा प्रकाशच पोहचत नाही. उत्तर इटलीतील विग्नेला गाव त्यापैकीच एक. त्या गावात हिवाळ्यात सूर्यप्रकाशच नसल्याने गावकऱ्याने मस्त डोकं लढवलं आणि हिवाळ्यात गावाने सूर्यप्रकाशासाठी स्वतःचा ‘सूर्य’ बनवला आहे.

 

गावात ८३ दिवस सूर्यप्रकाश नाही!

इटलीतील या गावात हिवाळ्यात ८३ दिवस सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे गावात पर्यटक कमी येत. गावातीव व्यवहारांवरही त्याचा परिणाम होत असे. त्यामुळे मग नैसर्गिक सूर्यप्रकाश थेट मिळत नसेल तर तोच प्रकाश परावर्तित करुन मिळवण्याची कल्पना पुढे आली.

 

इटलीतील गावाला मिळाला ‘सूर्य’

  • इटलीतील विग्नेलाचे उपमहापौर, पिअर फ्रँको मिडाली यांनी गावात सूर्यप्रकाश आणण्याचा निर्णय घेतला.
  • त्यांना गावात पर्यटकांची गजबज पाहिजे होती. त्यासाठीच त्यांनी आपल्या छोट्याशा गावाला कृत्रिम ‘सूर्य’ दिला.
  • डोंगराच्या माथ्यावर बसवलेला एक महाकाय आरसा शहराच्या चौकात सूर्यप्रकाश पसरवतो, ज्यामुळे गावकऱ्यांना हिवाळ्यातही सूर्य दिसू शकतो.
  • त्यामुळे कृत्रिम सूर्यवाले हे गाव जगभर चर्चेचा विषय झाला.

 

लक्षावधीच्या खर्चिक प्रकल्पातून अवतरला कृत्रिम सूर्य!

  • डोंगराच्या माथ्यावर एक मोठा आरसा आहे, ज्यातून सूर्यप्रकाश परावर्तित होऊन गावात पोहोचतो.
  • गावात सुमारे २०० लोक राहतात.
  • या कृत्रिम सूर्यापासून त्यांना सुमारे ६ तास प्रकाश मिळतो.
  • या प्रकाशामुळेच लोक हिवाळ्यात घराबाहेर पडतात आणि एकमेकांना भेटू शकतात.
  • ज्या विशाल काचेतून सूर्यप्रकाश गावात पोहोचतो, त्याचे वजन १.१ टन आहे.
  • हे आरसे संगणकाच्या मदतीने चालवले जाते.
  • हा पदार्थ ९५ टक्के सूर्यप्रकाश बदलतो.
  • या प्रकल्पाचा खर्च १ लाख युरो आहे.
  • या प्रकल्पाला खूप खर्च आला.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Deputy Mayor Pierre Franco Midaligood newsItaly ViganellamuktpeethSunlightWinterइटली विग्नेलाउपमहापौर पिअर फ्रँको मिडालीचांगल्या बातम्यामुक्तपीठसूर्यप्रकाशहिवाळा
Previous Post

राज्यात ४१ हजार नवे रुग्ण, तर ४० हजार घरी परतले!

Next Post

कोरोना महामारी नसणार कायमची! लवकरच होणार महामारीचा अंत!

Next Post
vaccination

कोरोना महामारी नसणार कायमची! लवकरच होणार महामारीचा अंत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!