Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुतणीने घातली जीन्स म्हणून काकानेच केली निर्घृण हत्या

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
up case

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशमधल्या देवरिया येथे एका काकानेच आपल्या पुतणीची निघृण हत्या केली आहे. जीन्स घालणे काकाला आवडत नव्हतं. पुतणीला सांगूनही तिने ऐकलं नाही. काकाने तिला मारहाण करुन हत्या केली. मुलीच्या वडीलांनीही याला पाठिंबा दिला आहे. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते नदीवर गेले. पुलावरुन मृतदेह खाली फेकत असताना, मुलीचा पाय रेलिंगमध्ये अडकला. यामुळे नदीत पडण्याऐवजी मृतदेह पुलावरच लटकला.

 

हे पाहून आरोपी काका आणि वडील घाबरले आणि पळून गेले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी काका अरविंद आणि वडील परमहंस यांना अटक केली. याप्रकरणी १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

 

काय आहे प्रकरण? 

  • २ दिवसांपूर्वी जीन्स घालण्यावरुन वाद झाला.
  • गुरुवारी पोलिसांनी या हत्येचा खुलासा केला.
  • महुआडीह पोलीस ठाणे परिसरातील संवरेजी खार्ग येथे राहणारे अमरनाथ पासवान पंजाबच्या लुधियाना येथे नोकरी करतात.
  • मुलीची आई शकुंतला देवी यांनी सांगितले की, १६ वर्षाची मुलगी नेहा काही दिवसांपूर्वी लुधियानाहून गावी आली होती. ती येथे शहरात मुली राहतात त्याप्रमाणे जीन्स घालायची.
  • नेहाला तिच्या काका आणि वडिलांनी अनेकदा जीन्स घालण्यास रोखले. परंतु, तिने ऐकले नाही. ती सहमत नव्हती.
  • नेहाला दोघांनीही खूप मारहाण केली. भिंतीवर आदळल्यानंतर डोक्याला मार बसला. यामुळे नेहाचा मृत्यू झाला.
  • घरातील इतर लोकांनीही या मारहाणीला पाठिंबा दिला.
  • मुलीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह फेकून देण्यासाठी वडील , काका  पटनवा पुलाजवळ देवरिया कसया रोड येथे घेऊन गेले.
  • जुन्या लोखंडी पुलावरून त्यांनी मृतदेह नदीत फेकण्याचा प्रयत्न केला.
  • पुलाच्या रेलिंगमध्ये नेहाचा एक पाय अडकला आणि तो मृतदेह तिथेच अडकला. त्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला.
  • १० जणांविरोधात गुन्हा दाखल तर दोघांना अटक करण्यात आलीय.
  • महुआडीहचे पोलीस राम मोहन राम यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीची आई शकुंतला देवी यांनीच मुलीच्या हत्येची तक्रार दिली.
  • तक्रारीरवरुन पोलिसांनी अरविंद, व्यास, परमहंस, भागणा, गुड्डी, पूजा, पन्ने लाल, राहुल आणि चालक हस्नेन यांच्यासह १० जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा आणि पुरावा लपवण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
  •  दोन जणांना अटकही करण्यात आली आहे.

 

 पोलीस सीमा वादात अडकले

१. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना मृतदेह रेलिंगमधून लटकत असल्याचे समजताच कारखाना पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.

२. घटनास्थळ दुसर्‍या भागात असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी तरकुलहा पोलिसांना कळविले.

३. पोलीस दोन सीमेवरील वादात अडकले होते. येथे मुलीचा मृतदेह ३ तास लोखंडी रेलिंगमधून लटकत राहिला.

४. तीन तासानंतर तरकुलहा पोलिसांनी मृतदेह खाली आणला. त्याला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.


Tags: muktpeethPoliceup policeUttar Pradesh
Previous Post

महाडमध्ये तळीये गावात ‘माळीण’ची पुनरावृत्ती

Next Post

आयएफएससीच्या चुका दुरुस्त करा.. अन्यथा तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही

Next Post
pm-kisan-samman

आयएफएससीच्या चुका दुरुस्त करा.. अन्यथा तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!