Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधानपदावरून जाताजाता इम्रान खान यांचं उफाळलं भारतप्रेम!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pakistan Imran Khan

मुक्तपीठ टीम

पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय गोंधळ सुरु आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर मतदानापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासियांना संबोधित केलं. या भाषणात त्यांनी भारताचं कौतुक केलं. भारत हा कसा एक स्वाभिमानी देश आहे, त्याचं त्यांनी केलेलं कौतुक विरोधकांचा रोष वाढवणारं ठरलं. भारत एवढाच चांगला तर तिथंच जाऊन राहा, असंही विरोधकांनी त्यांना सुनावलं.

 

भारत एक स्वाभिमानी देश- पंतप्रधान इम्रान खान

  • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासियांना संबोधित केले.
  • या भाषणात त्यांनी भारताचं कौतुक केलं.
  • त्यांनी म्हटलं की, मी भारतातील लोकांना इतरांपेक्षा अधिक जाणतो.
  • मला वाईट वाटतंय की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि काश्मीरमधील परिस्थितीच्या कारणामुळे संबंध बिघडले.
  • भारताबाबत काही बोलण्यास कुणाची हिंमत नाही.
  • कुणा परदेशी ताकदीची हिंमत नाहीय की, भारताच्या परराष्ट्रीय धोरणात हस्तक्षेप करेल.
  • भारत एक स्वाभिमानी देश आहे.
  • भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र असून, दबावाकडे दुर्लक्ष करून भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे.

 

लोकांनी रविवारी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे : इम्रान खान

  • अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी देशाला संबोधित करताना, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निर्णयामुळे आपण निराश आहोत.
  • त्यांच्या सरकारविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावामागे परकीय कारस्थानाचा हात असल्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाने केला नाही.
  • तसेच याबाबत उपलब्ध पुरावेही त्यांनी पाहिले नाहीत. रविवारी देशभरात आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी देशातील जनतेला केले.
  • इम्रान यांनी शुक्रवारी रात्री देशातील जनतेला संबोधित केले.
  • ते म्हणाले की मी सर्वोच्च न्यायालय आणि न्यायव्यवस्थेचा आदर करतो पण सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्यापूर्वी धमकीचे पत्र बघायला हवे होते.
  • मी माझ्या लोकांचा त्याग करू शकत नाही.
  • ३५ लाख लोकांना घरे सोडावी लागली.
  • ८० हजार लोकांचा मृत्यू झाला.
  • अमेरिकेकडून पैसे न घेता आम्ही दहशतवादाविरुद्धच्या युद्धात गेलो असतो तर अफगाणिस्तानातील आमच्या बांधवांना मदत केली असती.

 

शाहबाज शरीफ अमेरिकेचे हस्तक!

  • ते म्हणाले की, अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी पाकिस्तानी राजकारण्यांना भेटत असल्याचे आम्हाला समजले आहे.
  • काही महिन्यांपूर्वी त्यांनी नेत्यांना फोन करून इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव येणार असल्याचे सांगितले होते.
  • त्यामुळे पाकिस्तानी जनतेला माझा प्रश्न आहे की आपल्याला कसे सरकार हवे आहे.
  • शाहबाज शरीफ हे अमेरिकेचे हस्तक असल्याचा आरोप केला.

 

माझी परदेशात कोणतीही मालमत्ता नाही…

  • इम्रान खान म्हणाले, मी पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ल्यांना विरोध केला.
  • अफगाणिस्तानशी चर्चेचे समर्थन केले.
  • इराकमधील हल्ल्याला विरोध केला.
  • पाकिस्तानमध्ये ४०० ड्रोन हल्ले झाले, त्याचा निषेध केला.
  • माझ्याकडे परदेशात कोणतीही मालमत्ता किंवा बँक बॅलेन्स नाही आहे.

इम्रान सरकार हटवण्याच्या ‘परकीय षड्यंत्राची’ चौकशी करण्यासाठी आयोग

  • अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वी पाकिस्तान सरकारने इम्रान खान यांना हटवण्यासाठी आणलेल्या अविश्वास प्रस्तावामागील कथित “परकीय षड्यंत्र” च्या चौकशीसाठी लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल तारिक खान यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला आहे.
  • माहिती मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धमकीच्या पत्राची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • आयोग सरकार आणि त्याच्या स्थानिक मित्रपक्षांना अस्थिर करण्याच्या कटाच्या स्रोताची चौकशी करेल.
  • “आमच्याकडे पुरावे आहेत की आठ असंतुष्ट प्रांतीय खासदार परदेशी लोकांच्या संपर्कात होते,” फवाद म्हणाले.
  • सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासिम सूरी यांचा निर्णय रद्द करून इम्रान सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Tags: Imran KhanIndiaPakistanPrime M inister Imran Khanअविश्वास ठरावइम्रान खानपाकिस्तानभारतभारतप्रेम
Previous Post

शासनाच्या राज्य विकास कर्ज २०२२ ची ११ मे रोजी परतफेड

Next Post

भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता

Next Post
maharashtra state cabinet decisions 9-2-22

भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!