मुक्तपीठ टीम
पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय गोंधळ सुरु आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर मतदानापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासियांना संबोधित केलं. या भाषणात त्यांनी भारताचं कौतुक केलं. भारत हा कसा एक स्वाभिमानी देश आहे, त्याचं त्यांनी केलेलं कौतुक विरोधकांचा रोष वाढवणारं ठरलं. भारत एवढाच चांगला तर तिथंच जाऊन राहा, असंही विरोधकांनी त्यांना सुनावलं.
भारत एक स्वाभिमानी देश- पंतप्रधान इम्रान खान
- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासियांना संबोधित केले.
- या भाषणात त्यांनी भारताचं कौतुक केलं.
- त्यांनी म्हटलं की, मी भारतातील लोकांना इतरांपेक्षा अधिक जाणतो.
- मला वाईट वाटतंय की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि काश्मीरमधील परिस्थितीच्या कारणामुळे संबंध बिघडले.
- भारताबाबत काही बोलण्यास कुणाची हिंमत नाही.
- कुणा परदेशी ताकदीची हिंमत नाहीय की, भारताच्या परराष्ट्रीय धोरणात हस्तक्षेप करेल.
- भारत एक स्वाभिमानी देश आहे.
- भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र असून, दबावाकडे दुर्लक्ष करून भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे.
लोकांनी रविवारी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे : इम्रान खान
- अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी देशाला संबोधित करताना, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निर्णयामुळे आपण निराश आहोत.
- त्यांच्या सरकारविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावामागे परकीय कारस्थानाचा हात असल्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाने केला नाही.
- तसेच याबाबत उपलब्ध पुरावेही त्यांनी पाहिले नाहीत. रविवारी देशभरात आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी देशातील जनतेला केले.
- इम्रान यांनी शुक्रवारी रात्री देशातील जनतेला संबोधित केले.
- ते म्हणाले की मी सर्वोच्च न्यायालय आणि न्यायव्यवस्थेचा आदर करतो पण सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्यापूर्वी धमकीचे पत्र बघायला हवे होते.
- मी माझ्या लोकांचा त्याग करू शकत नाही.
- ३५ लाख लोकांना घरे सोडावी लागली.
- ८० हजार लोकांचा मृत्यू झाला.
- अमेरिकेकडून पैसे न घेता आम्ही दहशतवादाविरुद्धच्या युद्धात गेलो असतो तर अफगाणिस्तानातील आमच्या बांधवांना मदत केली असती.
शाहबाज शरीफ अमेरिकेचे हस्तक!
- ते म्हणाले की, अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी पाकिस्तानी राजकारण्यांना भेटत असल्याचे आम्हाला समजले आहे.
- काही महिन्यांपूर्वी त्यांनी नेत्यांना फोन करून इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव येणार असल्याचे सांगितले होते.
- त्यामुळे पाकिस्तानी जनतेला माझा प्रश्न आहे की आपल्याला कसे सरकार हवे आहे.
- शाहबाज शरीफ हे अमेरिकेचे हस्तक असल्याचा आरोप केला.
माझी परदेशात कोणतीही मालमत्ता नाही…
- इम्रान खान म्हणाले, मी पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ल्यांना विरोध केला.
- अफगाणिस्तानशी चर्चेचे समर्थन केले.
- इराकमधील हल्ल्याला विरोध केला.
- पाकिस्तानमध्ये ४०० ड्रोन हल्ले झाले, त्याचा निषेध केला.
- माझ्याकडे परदेशात कोणतीही मालमत्ता किंवा बँक बॅलेन्स नाही आहे.
इम्रान सरकार हटवण्याच्या ‘परकीय षड्यंत्राची’ चौकशी करण्यासाठी आयोग
- अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वी पाकिस्तान सरकारने इम्रान खान यांना हटवण्यासाठी आणलेल्या अविश्वास प्रस्तावामागील कथित “परकीय षड्यंत्र” च्या चौकशीसाठी लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल तारिक खान यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला आहे.
- माहिती मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धमकीच्या पत्राची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- आयोग सरकार आणि त्याच्या स्थानिक मित्रपक्षांना अस्थिर करण्याच्या कटाच्या स्रोताची चौकशी करेल.
- “आमच्याकडे पुरावे आहेत की आठ असंतुष्ट प्रांतीय खासदार परदेशी लोकांच्या संपर्कात होते,” फवाद म्हणाले.
- सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासिम सूरी यांचा निर्णय रद्द करून इम्रान सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.