मुक्तपीठ टीम
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथे झाला. २०१४ मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले. मोदी हे जगातील सर्वात आवडत्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या सरकारला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ८ वर्षात मोदी सरकारने देशाला अशा अनेक योजना दिल्या, ज्या सामान्य माणसापासून देशाच्या उन्नतीशी संबंधित आहेत.
पंतप्रधान मोदींच्या लोकप्रिय योजनांविषयीची सविस्तर माहिती
१. प्रधानमंत्री जन धन योजना
- प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत देशातील गरीबांचे बँक अकाउंट, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये झिरो बॅलेन्सवर उघडली जातात.
- या योजनेत ज्या खात्यांशी आधार कार्ड लिंक केले जाईल त्यांना ६ महिन्यांनंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा, २ लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, जीवन संरक्षणासह अनेक सुविधा मिळतात.
- जन धन खाते योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत ४६.४० कोटींहून अधिक खाते उघडण्यात आले आहेत. यामध्ये १.७२ लाख कोटी रुपये जमा आहेत.
२. आयुष्मान भारत योजना
- आयुष्मान भारत योजना मोदी सरकारने २०१८ मध्ये सुरू केली होती.
- लोककल्याणाच्या या योजनेचा उद्देश देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आरोग्य विमा उपलब्ध करून देणे हा होता.
- या योजनेअंतर्गत, भारत सरकार देशातील गरीब लोकांना वार्षिक ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देते.
३. पीएम किसान सन्मान निधी योजना
- पीएम नरेंद्र मोदी यांनी देखील देशातील लहान आणि गरीब शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत, त्यापैकी एक पीएन किसान सन्मान निधी योजना आहे.
- या योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरीब शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा दोन हजार रुपये देते.
- सरकार शेतकऱ्यांना सन्मान निधीच्या रूपात ६ हजार रुपये देते.
४. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
- पंतप्रधान मोदी सरकारची आणखी एक योजना आहे जी उज्ज्वला योजना म्हणून ओळखली जाते.
- ही योजना २०१६ मध्ये लागू करण्यात आली. या योजनेमुळे देशातील महिलांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे.
- या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.
- याचा फायदा ज्या गरीब घरांमध्ये चुलीवर लाकूड आणि कोळसा टाकून अन्न शिजवले जात होते, आता त्या घरांमध्ये या योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन पोहोचले आहेत त्यांना झाला.
५. डिजिटल इंडिया योजना
- मोदी सरकारच्या सर्वोत्तम योजनांमध्ये डिजिटल इंडिया योजनेचाही समावेश आहे.
- ही योजना २०१५ मध्ये सुरू झाली. भारताला डिजिटल मार्गावर जलद गतीने घेऊन देशातील प्रत्येक नागरिकाचे जीवन सुसह्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. . डिजिटल इंडियासाठी प्रसिद्ध उद्योगपती दिवंगत सायरस मिस्त्री यांनीही मोदी सरकारचे आभार मानले.
६. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना
- कमी उत्पन्न असलेल्या किंवा रोजच्या रोज कमावणाऱ्यांसाठी अन्नाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली.
- या योजनेंतर्गत प्रति व्यक्ती ५ किलो रेशन दरमहा मोफत दिले जाते.
- ८० कोटींहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला.
७. स्वच्छ भारत अभियान
- स्वच्छ भारत अभियान हे केंद्राच्या मोदी सरकारने सुरू केलेले राष्ट्रीय स्तरावरील अभियान आहे.
- या मोहिमेचा उद्देश रस्ते आणि शहरे स्वच्छ करणे हा आहे.
- ही मोहीम २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मोदी सरकारने ही योजना सुरू केली.
८. मेक इन इंडिया
मोदी सरकारच्या मेक इन इंडिया योजनेने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती दिली आहे.
मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी २५ सप्टेंबर २०१४ रोजी मेक इन इंडिया कार्यक्रम सुरू केला.
. महत्त्वपूर्ण गुंतवणूक आणि बांधकाम, पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नवीन नवकल्पनांसह भारताला जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता.
. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील उद्योजकतेला चालना देणे हा आहे जेणेकरून देशात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करता येईल.
९. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान
- पीएम मोदींनी २२ जानेवारी २०१५ रोजी हरियाणातील पानिपत येथून बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेची सुरुवात केली.
- यावेळी त्यांनी देशाला कन्या उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
- मुलांप्रमाणे मुलींचाही अभिमान असायला हवा, असे ते म्हणाले होते. बेटी बचाओ बेटी पढाओचे पोस्टर्सही मोदी सरकारने मुलींबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी लावले होते.
१०. नमामि गंगे
- गंगा नदीचे प्रदूषण संपवण्यासाठी आणि या पवित्र नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मोदी सरकारने नमामि गंगे नावाने गंगा पुनरुज्जीवन मिशन सुरू केले.
- या प्रकल्पासाठी, मोदी सरकारने बजेटमध्ये चार पटीने वाढ केली.
- नदीच्या स्वच्छतेसाठी २० हजार कोटी रुपये खर्च करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावित कृती आराखड्याला मंजुरी दिली.
या आणि अशा अनेक योजना आहेत ज्या मोदी सरकारद्वारे राबवल्या जात आहेत.