मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी पार पडला. या मंत्रिमंडळात एकूण ४३ नव्या मंत्र्यांचा समावेश करून केंद्रातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातून नव्यानं समावेश झालेल्या चार मंत्र्यांपैकी कोणाला कोणती जबाबदारी आणि किती महत्वाची मिळाली आहे, त्याचा आढावा.
बुधवारी संध्याकाळी शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर रात्री खातेवाटप जाहीर करण्यात आलं. मोदी मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर नवीन खातेवाटपानुसार रावसाहेब दानवे यांना बढती मिळाली आहे. नारायण राणे यांना मिळालेलं खातं हे अतिरिक्त जबबादारी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे होतं.
हेही वाचा: मोदी सरकारचं सातवं वर्ष पूर्ण होणार, रिकाम्या जागा भरण्यासह फेरबदलांचीही शक्यता
कोणाला कोणती जबाबदारी मिळाली?
नारायण राणे
- भाजपा नेते नारायण राणे यांना सर्वप्रथम मंत्रिपदाच्या शपथेचा मान मिळाला.
- राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
- गडकरींकडील हे अतिरिक्त खातं काढून नारायण राणेंना ही जबाबदारी देण्यात आलीय.
रावसाहेब दानवे
- रावसाहेब दानवे यांचं मंत्रिपद जाणार अशा अफवा काल पसरवल्या गेल्या होत्या.
- पण झालं उलटंच, नवीन खातेवाटपात रावसाहेब दानवे यांना बढती मिळाली.
- दानवे यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री, कोळसा राज्यमंत्री आणि खाणकाम राज्यमंत्री अशा तीन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा:ज्योतिरादित्य शिंदे मोदी सरकारमध्ये मंत्री बनण्याची शक्यता!
डॉ. भागवत कराड
- डॉ. भागवत कराड यांच्याकडे महत्वाचा पदभार सोपवण्यात आलाय.
- कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.
- वैद्यकीय क्षेत्रातील उच्चशिक्षित आणि खासगी रुग्णालय चालवणाऱ्या डॉ. कराड यांना महत्वाचं खातं मिळालं आहे.
कपिल पाटील
- भिवंडीतील भाजपाचे खासदार कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री व्हाया जिल्हा परिषद अध्यक्ष झाला आहे.
- खातेवाटपात पाटील यांच्याकडे पंचायतराज राज्य मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपण्यात आली आहे.
- ग्रामीण राजकारणात महत्वाच्या असणाऱ्या ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या माध्यमातून काम करण्याची संधी पाटील यांना मिळणार आहे.
डॉ. भारती पवार
- दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भारती पवार यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथही देण्यात आली.
- भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे पदभार सोपवण्यात आला आहे.
- एमबीबीएसची पदवी असलेल्या डॉ.भारती पवार या वैद्यकीय व्यावसायिक असल्यानं त्यांच्या शिक्षणाचा, व्यावसायिक अनुभवांचा लाभ खात्याचे काम करताना होणार आहे.
हेही वाचा: भाजपा बाहेरच्यांना संधी…कुंपणावरच्यांना संदेश! ‘कारभार-जात-उपरे आमचेच’ त्रिसुत्रीचा निवडीवर पगडा!
भाजपा बाहेरच्यांना संधी…कुंपणावरच्यांना संदेश! ‘कारभार-जात-उपरे आमचेच’ त्रिसुत्रीचा निवडीवर पगडा!