Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्य उत्पादन शुल्काच्या छाप्यात शहादा येथे अवैध बिअरसह मुद्देमाल जप्त

November 30, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
State excise department

मुक्तपीठ टीम

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात अवैध बिअरसह मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

            

मौजे वाडी गावाचे हद्दीतील पुर्नवसन कोरड्या पोसली नदीच्या पात्रात, ता. शहादा (जि. नंदूरबार) या ठिकाणी दारुबंदी कायद्यांतर्गत छापा टाकून केलेल्या गुन्हा अन्वेषण कारवाईमध्ये मध्यप्रदेश राज्यात निर्मिती केलेल्या व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या बिअरचे एकूण ४५० बॉक्स व एक भ्रमणध्वनी संच तसेच ०३ मालवाहक वाहने असा एकूण रुपये ३५,५५,०००/- इतक्या किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. या प्रकरणी अवैध बिअर साठा खरेदीदार आरोपीत मगन दखन्या वसावे, वय ३५ वर्ष रा. मु. पो. जिवन नगर, वाडीपूर, कुडावत जावदा, ता. शहादा (जि. नंदूरबार) यास अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर आहे.

State excise department            

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई या भरारी पथकाने २८.११.२०२१ रोजी मिळालेल्या माहितीनुसार मौजे वाडी गावाचे हद्दीतील पुर्नवसन कोरड्या पोसली नदीच्या पात्रात, ता. शहादा (जि. नंदुरबार) या ठिकाणी छापा टाकला. पहाटेच्या सुमारास एका चॉकलेटी रंगाच्या आशयर कंपनीच्या ट्रक क्र. MH-I8-AA-0204 मधून फक्त मध्यप्रदेश राज्यातच विक्रीकरिता निर्मिती केलेल्या परंतु, महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता प्रतिबंधित असलेल्या अवैध बिअर साठ्याची विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या आयात केली जाणार असून तो साठा दुसऱ्या एका आशयर कंपनीच्या डंपर क्र. GJ-34-T-1317 व एका महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप क्र. MH-04-HD-5710 या दोन वाहनांमधून महाराष्ट्र राज्यातील विविध भागात वितरित केला जाणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती.

                        

याच पथकामार्फत नोंदविलेल्या गुन्हा रजि. क्र. ३८१/२०२९ दि. १३.११.२०२१ नुसार मौजे मामाचे मोहिदा शिवारातील, नवीन तहसिल कार्यालयाच्या समोरील रोडवर, ता. शहादा (जि. नंदूरबार) या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये ०२ आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेले व मध्यप्रदेश निर्मित अवैध बिअरचे ५२० बॉक्ससह एक टेम्पो असा एकूण रु. २९,४५,६००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

            

एकाच महिन्यात शहादा, नंदूरबार येथे केलेल्या सलग दोन कारवायांमध्ये एकूण ०३ आरोपींच्या ताब्यातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या व मध्यप्रदेश राज्यात विक्रीकरिता निर्मिती केलेल्या अवैध बिअरचे ९७० बॉक्स जप्त करण्यात आले असून एकूण ०४ वाहनांसह रु.५७,००,६००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

            

या दोन्ही कारवाया कांतिलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशानुसार व सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त, कोकण विभाग, ठाणे व उषा वर्मा, संचालक (अ.ब.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदूरबार व त्यांचे कर्मचारी यांचे कारवाईवेळी सहकार्य लाभले.

            

या गुन्ह्याची फिर्याद विशाल बस्ताव, जवान बक्कल क्र. २६४ यांनी दिली असून पुढील तपास मनोज चव्हाण, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक मुंबई हे करत आहेत.

            

अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्रि क्रमांक १८०० ८३३ ३३३३ व व्हॉटस अॅप क्र. ८४२२००९१३३ तसेच दूरध्वनी क्र. ०२२-२२६३८८१ वर संपर्क साधावा, असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.


Tags: MaharashtraMauje WadinandurbarsahadaState Excise Departmentनंदूरबारमहाराष्ट्रमौजे वाडीराज्य उत्पादन शुल्क विभागशहादा
Previous Post

आघाडी सरकारच्या असंवेदनशील कारभारामुळे महिलांवरील अत्याचार वाढले

Next Post

ऑमिक्रॉन विषाणूचा वाढता फैलाव! इस्त्रायलनंतर जपानमध्येही परदेशी प्रवाशांसाठी प्रवासबंदी, भारतात कधी?

Next Post
japan close borders to all foreing visitors

ऑमिक्रॉन विषाणूचा वाढता फैलाव! इस्त्रायलनंतर जपानमध्येही परदेशी प्रवाशांसाठी प्रवासबंदी, भारतात कधी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!