मुक्तपीठ टीम
आयआयटी मद्रास नाविन्यपूर्ण विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी गणिताच्या माध्यमातून ‘आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग कोर्स’ हा कोर्स सादर करणार आहे. देशातील ही अग्रगण्य संस्था या अभ्यासक्रमाद्वारे कार्यरत व्यावसायिक आणि संशोधकांसह शाळा आणि महाविद्यालयातील १० लाख विद्यार्थ्यांना लक्ष्य करत आहे. देशभरातील हा अशा प्रकारचा नवीन उपक्रम आहे.
१० लाख विद्यार्थ्यांना जोडण्याचे लक्ष्य
- अधिकाऱ्यांनी म्हटले की, या प्रकारच्या पहिल्या उपक्रमांतर्गत आयआयटी मद्रास आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग कोर्सद्वारे शाळा आणि महाविद्यालयातील १० लाख विद्यार्थ्यांना जोडण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
- याशिवाय व्यावसायिक आणि संशोधकांनाही याच्याशी जोडले जाणार आहे.
- आयआयटी मद्रासचे संचालक व्ही कामकोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अभ्यासक्रम ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असेल.
ते म्हणाले, “हा अभ्यासक्रम भारतातील अशा प्रकारचा पहिला असून त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत दिसून येईल. येत्या काही वर्षांत या अभ्यासक्रमाचे फायदे आपल्याला पाहायला मिळतील.” हा अभ्यासक्रम मोफत असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विशेषत: ग्रामीण भारतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा विशेष फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोर्सची पहिली बॅच १ जुलैपासून सुरू होणार असून २४ जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
८ कंपन्यांच्या माध्यमातून अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू होईल
- आयआयटी मद्रासच्या सेक्टर ८ कंपनीच्या आयआयटी मद्रास प्रमोटर टेक्नॉलॉजीज फाउंडेशनच्या माध्यमातून आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग कोर्स ऑनलाइन मोडमध्ये विनामूल्य ऑफर केले जातील.
- यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी नाममात्र शुल्क भरावे लागणार आहे.
आर्यभट्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसचे संस्थापक-संचालक सदागोपन राजेश हे अभ्यासक्रम शिकवतील. गेल्या ३० वर्षांपासून ते शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणित शिकवत आहेत.