मुक्तपीठ टीम
IGNOU ने AICTE द्वारे मंजूर केलेला व्हर्च्युअल एमबीए प्रोग्राम सुरू केला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मंजूर केलेला व्हर्च्युअल मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन प्रोग्राम सुरू केला आहे.
विद्यापीठाने हा कार्यक्रम पाच वेगवेगळ्या स्पेशलायझेशनसाठी जारी केला आहे. त्यानुसार ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, फायनान्शिअल मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट आणि ऑपरेशनल मॅनेजमेंट आणि सर्व्हिस मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम चालवले जात आहेत. त्याचवेळी यासंदर्भात, इग्नूच्या परिपत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना चार सेमिस्टरमध्ये २८ अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. यासह, यात ११६ क्रेडिट्स देखील असतील. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आणि कमाल कालावधी चार वर्षांचा असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
कोण अर्ज करू शकतो?
जारी केलेल्या माहितीनुसार, किमान ५० टक्के गुणांसह (आरक्षित श्रेणीसाठी ४५ टक्के) पदवी असलेले उमेदवार व्हर्च्युअल एमबीए प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच उमेदवारांना कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय प्रवेश दिला जाणार आहे.
इग्नूने जारी केलेल्या अधिसूचनेत या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून डिजिटली अॅसिंक्रोनस आणि सिंक्रोनस समुपदेशन, मोबाइल अॅप, ई-मेल यांसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे संपूर्ण माहिती दिली जाईल. तर, या अभ्यासक्रमाशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
याव्यतिरिक्त, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने पीएचडी २०२१ प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. आता उमेदवार १४ जानेवारी २०२२ डिसेंबर २०२१ पर्यंत प्रवेशासाठी नोंदणी करू शकतात.