मुक्तपीठ टीम
टेक विश्वातील दिग्गज कंपनी अॅपल नेहमीच आपल्या आधुनिक फिचर्ससह अपडेट राहाण्याचा प्रयत्न करते. आजच्या काळात आयफोन हे तरूणाईमधील क्रेझ आहे. त्यामुळे कोण त्याच्या क्लिअॅरिटीवर भाळतं तर कोण त्याच्या स्मार्टनेसवर. आता अॅपलने उघड केले आहे की, त्यांची नवीन सॅटेलाइट-आधारित इमर्जन्सी एसओएस सेवा आता फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड आणि ब्रिटनमधील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
ही सॅटेलाइट-आधारित इमर्जन्सी एसओएस सेवा सर्व आयफोन-१४ मॉडेल्सवर उपलब्ध झाली आहे. हे यूजर्सना सेल्युलर आणि वाय-फाय कव्हरेजच्या बाहेर असताना आपत्कालीन सेवांसह मेसेज करण्याची सुविधा देते.
मोबाइल नेटवर्क नसले तरी लोकेशन शेअर करता येणार! कसं ते जाणू घ्या…
- जर यूजर्सना ग्रिडमधून प्रवास करताना मित्र आणि कुटुंबियांना त्यांच्या ठाव-ठिकाणाबद्दल माहिती द्यायची असेल, तर ते आता फाइंड माय अॅप उघडू शकतात.
- असे करून ते सॅटेलाइटद्वारे त्यांचे ठिकाण शेअर करू शकतात.
- आपत्कालीन एसओएस सॅटेलाइटद्वारे आपत्कालीन संवाद अधिक सुलभ होतो.
कोणत्या फोनमध्ये मिळणार ‘ही’ सुविधा?
- मिळालेल्या माहितीनुसार, सेल्युलर किंवा वाय-फाय कव्हरेज नसताना ९९९ किंवा ११२ वर संपर्क साधण्यासाठी सॅटेलाइट कनेक्शन वापरणे ही अॅपलने सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिलेली प्रगती आहे.
- ज्याला अॅपलने सर्वसामान्यांसाठी आयफोन-१४ सह लॉंच केले आहे.
- ही सुविधा आयफोन-१४, आयफोन-१४ प्लस, आयफोन-१४ प्रो आणि आयफोन-१४ प्रो मॅक्समध्ये दोन वर्षांसाठी मोफत असेल.