Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोरोना नियमांचा भंग, तिथं पुन्हा लॉकडाऊन!”

गृह मंत्रालयाचे राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona (3)

मुक्तपीठ टीम

कोरोनाची दुसरी लाट मंदावत असतानाच लोक बाजारात व पर्यटनस्थळांवर गर्दी करायला सुरुवात केली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग यासारख्या नियमांचा फज्जा उडवला आहे. केंद्र सरकारने आणि स्वत: पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतरही फारसा फरक झाला नाही. अशा परिस्थितीत आता गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ज्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन केले जात नाही तेथे पुन्हा लॉकडाऊन लावण्यास सांगितले आहे.

पर्यटकांच्या बेशिस्त गर्दीमुळे चिंता

  • गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात पर्यटनस्थळी होत असलेल्या पर्यटकांच्या गर्दीचा उल्लेखही करण्यात आला आहे.
  • नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पर्यटकांच्या गर्दीबद्दल नापसंती व्यक्त केली होती.
  • मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की सक्रिय रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे.
  • १९ जूनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे, निर्बंधात शिथिलता सावधगिरीने देण्यात यावी. आता पुन्हा त्या सूचनेचा पुनरुच्चार केला जात आहे.

देशाच्या बऱ्याच भागांमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन

  • कोरोना नियमांचे उल्लंघन देशाच्या बर्‍याच भागात दिसून येत आहे.
  • विशेषतः सार्वजनिक वाहतूक आणि हिल स्टेशन्ससारख्या पर्यटनस्थळी.
  • बाजारपेठांमध्येही गर्दी होत आहे आणि सामाजिक अंतरासारख्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
  • दरम्यान, काही राज्यांमध्ये आर फॅक्टर मध्ये वाढ होणे ही चिंतेचे कारण आहे.
  • आपल्याला माहित आहे की १.० पेक्षा जास्त आर घटक कोरोनाचा प्रसार दर्शवितात.
  • म्हणूनच दुकाने, मॉल्स, मार्केट, बाजारपेठे, साप्ताहिक बाजार, रेस्टॉरंट्स, बार, मंडई, बसस्थानक, रेल्वे प्लॅटफॉर्म, उद्याने, व्यायामशाळा, लग्नाचे हॉल, क्रीडा संकुल इत्यादी सर्व गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळणे महत्वाचे आहे.

आगामी लाटा रोखण्यासाठी आताच पावले उचला!

  • कोरोना रोखण्याबाबतच्या नियमांचे पालन होत नसलेला परिसर किंवा बाजारपेठ इत्यादींवर पुन्हा बंदी घालावी.
  • कोरोनाचा प्रसार रोखता येऊ शकेल, याची काळजी घ्यावी.
  • याशिवाय कठोर कायदेशीर कारवाई करा.
  • आगामी लाटा रोखण्यासाठी आताच पावले उचलण्यात यावी.

पर्यटन स्थळं, बाजारांमधील गर्दी योग्य नाही – पंतप्रधान मोदी

  • यापूर्वी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संभाव्य तिसर्‍या लाटेबद्दल चिंता व्यक्त केली होती.
  • पर्यटन स्थळं, बाजारात मास्कशिवाय आणि प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष करत गर्दी करणे योग्य नाही असे ते म्हणाले होते.
  • ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे.
  • लोकांना हे समजले पाहिजे की तिसरी लाट स्वत: हून येणार नाही.
  • प्रश्न असा आहे की ती कशी थांबवायची?
  • प्रोटोकॉल कसे अनुसरण करावे?
  • कोरोना स्वतः येत नाही, जर कोणी जाऊन आणले तर तो येतो.
  • जर आपण खबरदारी घेतली तरच आपण तिसऱ्या लाटेवर मात करू शकतो.

Tags: Covid protocolslockdownPM Narendra modiकोरोनागृहसचिव अजय भल्लापंतप्रधान नरेंद्र मोदीलॉकडाऊन
Previous Post

केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ! ५० लाख केंद्रीय कर्मचारी, ६१ लाख निवृत्ती वेतनधारकांना मॉन्सून गिफ्ट!!

Next Post

आवड अध्यात्म समजवण्याची, लावूनी गोडी लोकसाहित्याची!

Next Post
wari

आवड अध्यात्म समजवण्याची, लावूनी गोडी लोकसाहित्याची!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!