मुक्तपीठ टीम
कोरोनाची दुसरी लाट मंदावत असतानाच लोक बाजारात व पर्यटनस्थळांवर गर्दी करायला सुरुवात केली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग यासारख्या नियमांचा फज्जा उडवला आहे. केंद्र सरकारने आणि स्वत: पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतरही फारसा फरक झाला नाही. अशा परिस्थितीत आता गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ज्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन केले जात नाही तेथे पुन्हा लॉकडाऊन लावण्यास सांगितले आहे.
पर्यटकांच्या बेशिस्त गर्दीमुळे चिंता
- गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात पर्यटनस्थळी होत असलेल्या पर्यटकांच्या गर्दीचा उल्लेखही करण्यात आला आहे.
- नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पर्यटकांच्या गर्दीबद्दल नापसंती व्यक्त केली होती.
- मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की सक्रिय रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे.
- १९ जूनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे, निर्बंधात शिथिलता सावधगिरीने देण्यात यावी. आता पुन्हा त्या सूचनेचा पुनरुच्चार केला जात आहे.
देशाच्या बऱ्याच भागांमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन
- कोरोना नियमांचे उल्लंघन देशाच्या बर्याच भागात दिसून येत आहे.
- विशेषतः सार्वजनिक वाहतूक आणि हिल स्टेशन्ससारख्या पर्यटनस्थळी.
- बाजारपेठांमध्येही गर्दी होत आहे आणि सामाजिक अंतरासारख्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- दरम्यान, काही राज्यांमध्ये आर फॅक्टर मध्ये वाढ होणे ही चिंतेचे कारण आहे.
- आपल्याला माहित आहे की १.० पेक्षा जास्त आर घटक कोरोनाचा प्रसार दर्शवितात.
- म्हणूनच दुकाने, मॉल्स, मार्केट, बाजारपेठे, साप्ताहिक बाजार, रेस्टॉरंट्स, बार, मंडई, बसस्थानक, रेल्वे प्लॅटफॉर्म, उद्याने, व्यायामशाळा, लग्नाचे हॉल, क्रीडा संकुल इत्यादी सर्व गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळणे महत्वाचे आहे.
आगामी लाटा रोखण्यासाठी आताच पावले उचला!
- कोरोना रोखण्याबाबतच्या नियमांचे पालन होत नसलेला परिसर किंवा बाजारपेठ इत्यादींवर पुन्हा बंदी घालावी.
- कोरोनाचा प्रसार रोखता येऊ शकेल, याची काळजी घ्यावी.
- याशिवाय कठोर कायदेशीर कारवाई करा.
- आगामी लाटा रोखण्यासाठी आताच पावले उचलण्यात यावी.
पर्यटन स्थळं, बाजारांमधील गर्दी योग्य नाही – पंतप्रधान मोदी
- यापूर्वी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संभाव्य तिसर्या लाटेबद्दल चिंता व्यक्त केली होती.
- पर्यटन स्थळं, बाजारात मास्कशिवाय आणि प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष करत गर्दी करणे योग्य नाही असे ते म्हणाले होते.
- ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे.
- लोकांना हे समजले पाहिजे की तिसरी लाट स्वत: हून येणार नाही.
- प्रश्न असा आहे की ती कशी थांबवायची?
- प्रोटोकॉल कसे अनुसरण करावे?
- कोरोना स्वतः येत नाही, जर कोणी जाऊन आणले तर तो येतो.
- जर आपण खबरदारी घेतली तरच आपण तिसऱ्या लाटेवर मात करू शकतो.