मुक्तपीठ टीम
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या स्त्री कार्यकर्त्यांच्या आदर्श गाव संकल्पना सादरीकरणाची. किरवली राऊतपाड्याच्या हर्षाली राऊत आणि अन्य लेकींनी महिलांना आवश्यक वाटणारं आदर्श गाव मांडलंय…
नमस्कार, हे आमचं स्वप्नातलं गाव आहे. आम्हा सर्वांना असं वाटतं की, आमचं गाव हे असं असावं. ज्यामध्ये डोंगर, दऱ्या असतील. आणि ते पूर्णता, हिरवे असेल. त्यानंतर गावाला लाभलेली ही नदी आणि नदीच्या माध्यमातून चालू असलेली ही शेती आहे. आपण बघू शकता, की नदीच्या माध्यमातून आम्ही नदीचं पाणी घेऊन शेती करत आहेत. त्यानंतर आमच्याकडे एक तलाव आहे. सगळीकडे बाजूला हिरवळ आहे. नदी आहे नदीकिनारी हिरवळ आहे. नदीत मासे आहेत. गावामध्ये मासेमारीचाही धंदा आहे. त्यासाठी नदीच नाही तर इतरही स्त्रोत आहेत.
त्याचबरोबर आमच्या गावामध्ये एक तलाव आहे. त्या तलावाचा आम्ही दरवर्षी लिलाव करत असतो. त्यामध्ये लोकांना मासे टाकायला देतो. त्यांना तलावातील पाणी आणि मासे वापरता येतील आणि त्या व्यवसायातून मिळणारा नफा जो त्या लिलावामध्ये तलाव घेईल त्यांना होईल आणि तलावाच्या लिलावातून मिळणारे पैसे आम्ही ग्रामपंचायतसाठी वापरणार आहोत.
त्यानंतर आमच्या गावामध्ये एक सार्वजनिक शौचालय आहे, ग्रामपंचायत आहे. एक जिल्हापरिषद शाळा आहे, मंदिर आहे, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, जागोजागी कचरा कुंड्या आहेत, विहिर आहे, बोरींग आहे आणि आमच्या गावांमध्ये पाण्याची किंवा कसलीच कमतरता नाही आहे, जिथे सुसज्ज रस्ते आहेत. असं हे आमच्या सर्वांचं खेड्यापाड्यातलं स्वप्नातलं गाव आहे.
पाहा व्हिडीओ: