मुक्तपीठ टीम
बिहारमध्ये काम सुरु असलेल्या पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. पण हा पूल जोरदार वारा, धुक्यामुळे कोसळल्याचा दावा एका ‘आयएएस’ अधिकाऱ्याने केल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. २९ एप्रिलला बिहारमधील सुलतानगंज येथील काम सुरु असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
गडकरींना आश्चर्याचा धक्काच!!
- एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, “२९ एप्रिलला बिहारमध्ये पूल कोसळला.
- मी माझ्या सेक्रेटरीला या दुर्घटनेची कारण विचारली.
- यावर त्याने मला जोरदार वारा, धुक्यामुळे पूल कोसळला असं उत्तर दिलं.
- आयएएस अधिकाऱ्याचं हे उत्तर ऐकून नितीन गडकरींना आश्चर्याचा धक्काच बसला.
- एक आयएएस अधिकारी असं उत्तर कसं काय देऊ शकतो.
- मला एक समजत नाही हवेने कसा काय पूल कोसळू शकतो? काहीतरी चूक झाली असणारच.
- यावेळी त्यांनी दर्जेशी तडजोड न करता पुलाच्या कामाचा खर्च कमी करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
एनआयटीच्या पथकाने तपास केला
- हा पूल सुमारे १ हजार ७१० कोटी रुपये खर्चून बांधला जात होता.
- सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
- या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ग्रामीण व्यवहार विभागाचे सचिव पंकज पाल सुलतानगंज येथे पोहोचले. त्याच्यासोबत पाटण्याहून एनआयटीची टीमही पोहोचली होती.
- सचिवांनी सांगितले की, एनआयटी पटनाचे तज्ज्ञ पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
- विशेष म्हणजे या घटनेनंतरही पुलाच्या बांधकामाचे काम वेळेत पूर्ण होणार असल्याचे ग्रामीण कार्य विभागाचे सचिव म्हणाले.
- डिसेंबरमध्ये पुलाच्या उद्घाटनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, कोणत्याही परिस्थितीत पुलाच्या बांधकामाचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण केले जाईल.