मुक्तपीठ टीम
कार प्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. फॅमेलीसोबत फिरायला जायचा प्लॅन आहे? पण कारचा प्रॉब्लम आहे, चिंता करू नका कारण, लवकरच हुंडाई घेऊन येत आहे ‘स्टारिया’ फॅमिली कार. ही कार १३ एप्रिल रोजी भारतात येईल अशी हुंडाईने घोषणा केली आहे. स्टारिया ही एक अतिशय लक्झरी मल्टी पर्पज गाडी आहे ज्यात बरीच जागा मिळेल तसेच त्यात उत्कृष्ट फीचर्सचा देखील समावेश असेल. भारतात सध्या एमपीव्ही कारची संख्या आहे, स्टारिया या सर्वांपेक्षा अधिक चांगली आहे, त्याचबरोबर याची रचनाही खूप वेगळी आहे.
हुंडाई स्टारियाच्या फ्रन्टला लार्ज मॅश ग्रिल, फ्रन्ट पोर्शनमध्ये बोनटवर एलईडी डीआरएलसह मोठ्या आकारात चौरस आकाराचे हेडलॅम्प युनिट्स आहेत, ज्यामुळे या कारला अतिशय आकर्षक लूक मिळतो. ही एक ७ सीट्सची एमपीव्ही असेल, यात मोठे कुटुंब सहजपणे बसू शकेल. या सेगमेन्टमधील बरीच वाहने भारतात आहेत आणि आता हुंडाईही येत्या एमपीव्हीसह या सेगमेन्टमध्ये पाऊल टाकत आहे.
हुंडाई स्टारिया भारतात असलेल्या एर्टिगा, किआ कार्निवल आणि डॅटसन गो प्लस, रेनो ट्राइब सारख्या एमपीव्हीशी स्पर्धा करेल. कंपनीने रिलीज केलेल्या हुंडाई स्टारियाच्या टीझरमध्ये त्याच्या सोयी आणि लक्झरीवर विशेष भर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या एमपीव्हीची सोय खासगी विमान आणि क्रूझ सारखीच असेल. अशा परिस्थितीत ग्राहकांना या कारमध्ये लक्झरीचा अभाव जाणवणार नाही. या कारचे बाहेरील फीचर्स यापूर्वीच समोर आले आहेत, तसेच या कारची किंमतही येत्या काळात समोर येईल.
हुंडाई स्टारिया एमपीव्ही कोरियन आर्किटेक्चर हनोचद्वारे प्रेरित आहे. या कारमध्ये एक आलीशान केबिन आहे जी पूर्णपणे डिजिटल आहे आणि ग्राहकांना त्यातील उत्कृष्ट फीचर्स बघायला मिळतील. मिळालेल्या माहितीनुसार या कारच्या पुढील बाजूस १०.२५ इंचाचे सेन्सर कन्सोल आहे जे टच फंक्शन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे जे डॅशबोर्डवर लावले जाईल.