Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ह्युंडाईची एसयूव्ही, टाटा नॅनोपेक्षाही छोटी, आखूड शिंगी-बहुगुणी!

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
hyundayi

मुक्तपीठ टीम

खरं तर एसयूव्ही म्हटलं की ती कशी भलीमोठी दणकट अशीच आठवते. पण वाहतूकीच्या कमाल कोंडीच्या काळात गाडीही कशी अंग चोरून धावते. पार्किंगचंही एक आव्हानच असतं. बहुधा त्यामुळेच आता ह्युंडाई लवकरच नवीन मायक्रो एसयूव्ही बाजारात आणणार आहे. ‘ह्युंडाई’ची ही सर्वात छोटी एसयूव्ही असेल. तिचे नाव मायक्रो एसयूव्ही असेल. ही नवीन एसयूव्ही प्रथम कोरियामध्ये विक्रीस जाईल आणि त्यानंतर भारतीय बाजारात विक्री होईल. त्याच्या लांबीबद्दल बोलायचे झाल्यास ती टाटा नॅनोच्या ३०९९ मिमी लांबीपेक्षाही कमी असेल.

 

ह्युंडाईने कोरियात या एसयूव्हीचे कॅस्पर असे नाव ठेवले आहे. या मायक्रो एसयूव्हीची किंमत ५ लाख रुपये असू शकते. जी एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात कमी किंमत आहे.

 

एसयूव्हीचे नाव कॅस्पर असेल

  • बाजारात ‘ह्युंडाई’ आपल्या कारला अनोखी नावे देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.
  • जसे क्रेटाला आयएक्स २५ तर काही देशांमध्ये वर्ना को सोलारिस किंवा एक्सेंट देखील म्हणतात.
  • यामुळेच कोरियामधील मायक्रो-एसयूव्हीचे नाव कॅस्पर असेल.

 

मायक्रो एसयूव्ही कधी येणार?

  • सप्टेंबरपर्यंत जागतिक बाजारात ही लॉन्च करण्यात येईल.
  • त्यानंतरच ती इतर बाजारात आणि भारतीय बाजारात आणली जाईल.
  • कॅस्पर ‘ह्युंडाई’ची सर्वात छोटी एसयूव्ही असेल, म्हणजे ती सब फोर मीटर व्हेन्यू कॉम्पॅक्ट एसयूव्हीपेक्षा लहान असेल.
  • भारतातील सब फोर मीटर व्हेन्यू कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये टाटा नेक्सन (७.१९ ते १३.२३ लाख रुपये), मारुती विटारा ब्रेझा (७.५१ ते ११.४१ लाख) आणि हुंडाई व्हेन्यू (६.९२ – ११.७८ लाख) यांचा समावेश आहे.

 

‘ह्युंडाई’ मायक्रो एसयूव्हीचा आकार किती?

  • ‘ह्युंडाई कॅस्पर सुमारे १४२ इंच (३,५९५ मिमी) लांब, सुमारे ६३ इंच रुंद आणि सुमारे ६२ इंच उंच आहे.
  • ‘ह्युंडाईची सर्वात छोटी एसयूव्ही थोडीशी लहान आणि संकुचित असेल.
  • तर त्याची सर्वात छोटी एसयूव्ही सॅन्ट्रो हॅचबॅकपेक्षा उंच असेल.
  • जी ३६१० मिमी लांब, १६४५ मिमी रुंद आणि १५६० मिमी उंच आहे.

 

मायक्रो एसयूव्हीची स्पेसिफीकेशन्स

  • कॅस्परमध्ये १.२ लीटर, फोर सिलेंडर एस्पिरेटेड इंजिन दिले जाईल जे ग्रँड आय १० निओसला सपोर्ट करते.
  • ‘ह्युंडाई कॅस्पर टाटा एचबीएक्स मायक्रो-एसयूव्ही, मारुती सुझुकी इग्निस आणि महिंद्रा केयूव्ही १०० सारख्या हाय रायडिंग हॅचबॅकसह स्पर्धा करू शकते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Hyundai micro suvकोरियामायक्रो एसयूव्हीह्युंडाई
Previous Post

भला मोठा स्पेस बलून…आकाशात एक लाख फूटांवर करा लग्न!

Next Post

पोस्टात १०वी उत्तीर्णांसाठी मोठी रोजगार संधी, २,३५७ जागा!

Next Post
gnm (23)

पोस्टात १०वी उत्तीर्णांसाठी मोठी रोजगार संधी, २,३५७ जागा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!