मुक्तपीठ टीम
ह्युंडेईच्या ह्युंडेई आयोनिक-5चा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. ही नवी इलेक्ट्रिक कार आहे. तिचं भारतीय रस्त्यावरील पहिलं दर्शन भारतात घडलं आहे, चेन्नईमध्ये! विशेष म्हणजे, गुरुग्राममध्ये ह्युंडेईच्या नवीन मुख्यालयाच्या उद्घाटन समारंभात ऑल-इलेक्ट्रिक आयोनिक ५ लोकांसमोर सादर करण्यात आली होती. मात्र, ह्युंडेईने अद्याप आयोनिक ५ भारतात लाँच करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाला दोन बॅटरींचे पॅक
- ह्युंडेई आयोनिक ५ या इलेक्ट्रिक कारचे फेब्रुवारी २०२१ मध्ये लाँचिंग झाले.
- ही कार इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे.
- ह्युंडेई आयोनिक ५ मध्ये ५८ किलोवॅट आणि ७२.६ किलोवॅटचे दोन बॅटरी पॅक आहेत.
- कारमेकर दोन्ही बॅटरींसह रियर-व्हील ड्राइव्ह किंवा ऑल-व्हील ड्राइव्ह सेटअप आहे.
- मोठा बॅटरी पॅक ४८१ किलोमीटर पर्यंत डब्ल्यूएलटीपी रेंज ऑफर करतो, तर दुसरा बॅटरी पॅक ३८५ किलोमीटरपर्यंत रेंज ऑफर करतात.
सिंगल चार्जमध्ये उत्तम रेंज
- पोर्श टेकॅनप्रमाणे, आयोनिक ५ देखील ८०० व्होल्ट सुपर फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान वापरते.
- डब्ल्यूएलटीपीनुसार, सर्वात वेगवान चार्जरसह १८ मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज केले जाऊ शकते.
- याशिवाय, पाच मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १०० किमीपर्यंतचा वापर करता येतो.
- मिळालेल्या माहितीनुसार, ह्युंडेई २०२२ किंवा २०२३ मध्ये भारतात आयोनिक ५ लाँच करण्याची योजना आखत आहे.
ह्युंडेई आयोनिक ५ चे विशेष फिचर्स
- ह्युंडेई आयोनिक ५ ही एक भविष्यकालीन इलेक्ट्रिक क्रॉसओवर एसयूव्ही आहे.
- ही ई-कार आकर्षक डिझाइनने परिपूर्ण आहे ज्यामुळे लोकांचे लक्ष वेधले जाते.
- ह्युंडेईचे असे म्हणणे आहे की, आयोनिक ५ ची बाह्य रचना पोनी (कार निर्मात्याची पहिली मास-मार्केट कार) पासून प्रेरित आहे.
- याच्या फ्रंटला हाय एलईडी हेडलाइट्स आणि क्वाड डीआरएल देण्यात आले आहेत.
- त्याचप्रमाणे, मागील बाजूस चौकोनी आकाराचा एलईडी रिअर लाइट आणि इंटिग्रेटेड स्पॉयलर मिळतो.
- केबिनमध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट टचस्क्रीनसह दोन मोठे १२.२५ इंचाचे डिस्प्ले आहेत.
- याशिवाय ह्युंडेईने या ई-कारमध्ये बोस साउंड सिस्टीम, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, हँड्स-फ्री टेलगेट, ३६० डिग्री कॅमेरा, सात एअरबॅग आणि लेव्हल २ ऑटोनोमस सुविधा देण्य़ात आलेल्या आहेत.