मुक्तपीठ टीम
आज १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यावेळी प्रथमच लाल किल्ल्यावरच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात २१ तोफांच्या सलामीसाठी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी हॉवित्झर तोफा, अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (एटीजीएस) प्रोटोटाइपचा वापर केला जाणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त यावेळी अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पारंपारिकपणे वापरल्या जाणार्या ब्रिटिश बंदुकीसह डीआरडीओने डिझाइन केलेल्या आणि विकसित केलेल्या संपूर्ण स्वदेशी ATAGS मधून औपचारिक २१ तोफांची सलामी दिली ठरवण्यात आली आहे. स्वदेशी तोफा विकसित करण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचे प्रतिक करण्याच्या उद्देशाने तोफ वापरण्याचा पुढाकार घेण्यात आला आहे.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी खास निमंत्रणे…
- यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी खास निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.
- देशातील सर्व जिल्ह्यांतील एनसीसी कॅडेट्सना लाल किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
- हे कॅडेट्स ‘ज्ञानपथ’वर बसतील. भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक असलेले स्थानिक कपडे परिधान करून ते ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा संदेश देतील.
- समाजातील त्या वर्गाला विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे, ज्याकडे सहसा दुर्लक्ष केले जाते.
- यामध्ये अंगणवाडी सेविका, रस्त्यावरीव विक्रेते, मुद्रा योजनेचे कर्जदार, शवागार कर्मचारी इत्यादींचा समावेश आहे.
- लाल किल्ल्यावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.